महाविकास आघाडी सरकारची प्रचार मोहीम सुसाट; लोककलेच्या माध्यमातून पिटणार कामांची दवंडी!

महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारने आपल्या कामाची द्विवर्षपूर्ती झाल्याचे निमित्त साधून आता जिल्हानिहाय प्रचार मोहीम सुरू केलीय. नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये लोककलेच्या माध्यमातून राज्य सरकार आपण केलेल्या कामांची दवंडी पिटणार आहे.

महाविकास आघाडी सरकारची प्रचार मोहीम सुसाट; लोककलेच्या माध्यमातून पिटणार कामांची दवंडी!
नाशिकमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कामाच्या प्रचाराची जबाबदारी जनसंपर्क कार्यालयाने तीन कलापथकांकडे सोपवली आहे.
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 10:54 AM

नाशिकः सरकार (Government) कोणतेही असो. केंद्रातले भाजप (BJP) सरकार, दिल्लीचे केजरीवाल सरकार, उत्तर प्रदेशातले योगी सरकार. आपल्या कामाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ते सरकारच्या प्रत्येक विभागाचा खुबीने वापर करून घेतात. मग त्यात जनसंपर्क विभाग तर हक्काचा. आपण केलेल्या प्रचार मोहिमेसाठी वृत्तपत्रात पान-पान जाहिराती दिल्या जातात. टीव्हीवर पाच-पाच मिनिटे त्यांचे प्रक्षेपण केले जाते. आता त्याच पंगतीत जावून महाराष्ट्रातले महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार बसले आहे. या सरकारने तर आपल्या कामाची द्विवर्षपूर्ती झाल्याचे निमित्त साधून आता जिल्हानिहाय प्रचार मोहीम सुरू केलीय. नाशिकमध्ये लोककलेच्या माध्यमातून सरकार आपण केलेल्या कामांची दवंडी पिटणार आहे.

तीन पथकांची निवड

राज्यातील महाविकास आघाडी शासनाला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये लोककलेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी शासनमान्य यादी वरील लोककला पथकांममधील तीन पथकांची निवड करण्यात आली आहे. ‘दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या घोषवाक्यासह जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत व्यापक जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. जिल्ह्यातील दहा शासनमान्य यादीवरील लोककला पथकांना पटकथेसह सादरीकरणाची संधी देण्यात आली होती. त्यातील तीन लोककला पथकांची निवड करण्यात आली आहे.

63 कार्यक्रमांचे सादरीकरण

आज 7 मार्च 2022 पासून जिल्ह्यातील 15 तालुक्यांत ही लोककलेच्या माध्यमातून ही मोहीम राबविली जाणार असून, पहिल्या टप्प्यात 11 मार्च पर्यंत 63 कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे. प्रत्येक कलापथक 21 कार्यक्रमांचे सादरीकरण करणार असून त्यात जिल्हा मुख्यालयाचे गर्दीचे ठिकाण, तालुका मुख्यालयाचे गर्दीचे ठिकाण, कृषी उत्पन्न बाजार समित्या, गाव जत्रा, आठवडे बाजार, उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे, रेल्वे स्थानकांच्या बाहेरचा परिसर जिल्ह्यातील याठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

तालुकानिहाय कलापथके

– चाणक्य कलामंच कलापथक, नाशिक (पेठ, सुरगाणा, इगतपुरी, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर) – नटराज लोककला अकादमी, इगतपुरी (मालेगाव, बागलाण, मनमाड, सिन्नर, कळवण) – आनंद तरंग फाउंडेशन, इगतपुरी (नाशिक, निफाड, येवला, नांदगांव, चांदवड)

इतर बातम्याः

ऐतिहासिक नाशिकला स्मार्ट सिटीचा चूड; गोदाघाट उद्धवस्त करून मंदिरे तोडली, आंदोलन पेटणार!

युक्रेनमधले 16 विद्यार्थी सुखरूप परतले; नाशिककरांच्या आनंदाला पारावार नाही, वाजत-गाजत स्वागत!

अर्थमंत्री विरुद्ध ऊर्जामंत्री वादाचा 2 लाख 50 हजार उद्योजकांना फटका, या अधिवेशनात तरी तोडगा निघणार का?

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.