Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे जिल्हा बँकेत महाविकासआघाडीचा दारुण पराभव, बविआ आणि भाजपच्या पॅनेलची बाजी

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. TDCC bank election

ठाणे जिल्हा बँकेत महाविकासआघाडीचा दारुण पराभव, बविआ आणि भाजपच्या पॅनेलची बाजी
एकनाथ शिंदे, डॉ. जितेंद्र आव्हाड
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 6:49 PM

ठाणे: सहकार पॅनेलनं ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत बाजी मारली आहे. सहकार पॅनेलनं 21 पैकी 18 जागा जिंकल्या असून मतदारांनी महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर व भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार किसन कथोरे यांनी मतदारांचे यावेळी आभार मानले. ( Mahavikas Aghadi lost TDCC bank election Sahkar Panel win 18 seats)

परिवर्तन पॅनेलला मतदारांनी नाकारलं

परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड या दोन्ही मंत्र्यानी ही निवडणूक प्रतिष्ठेची करून सुद्धा बँकेच्या मतदारांनी त्यांना नाकारले, असे भाजप आमदार संजय केळकर यांनी सांगितले. सहकार पॅनलचे गेल्या टर्म मधील कार्याला मिळालेली ही पोहोचपावती असून सहकार पॅनलमध्ये अनुभवी संचालक असून पुढील काळात बँक अधिक नावारुपाला नेण्याचे काम हे संचालक करतील असा विश्वास संजय केळकर यांनी बोलताना व्यक्त केला.

महाविकास आघाडीला तीन जागा

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला 9 भाजपा 7 व अन्य 2 असे सहकार पॅनलचे 18 उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून आले आहे.

15 जागांसाठी मतदान

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक 30 मार्च रोजी झाली. ही निवडणूक महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्रित लढवली. या निवडणुकीत 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले तर उरलेल्या 15 जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक झाली. जिल्हा बँकेच्या निडणुकीत एकूण जागांसाठी 46 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं. 3062 मतदारांनी मतदान केले. त्यासाठी जिल्ह्यात एकूण 15 मतदान केंद्रांवर मतदान झालं. या निवडणुकीमध्ये कृषी-पतसंस्थांमधून 14, पगारदार पतसंस्थांमधून 1, खरेदी-विक्री संघातून 1, महिला राखीव 2, अनु.जाती-जमातींसाठी 1 आणि ओबीसींसाठी 1 जागा राखीव आहे. 3 हजार 68 मतदार या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार होता.

संबंधित बातम्या

TDCB Election | संचालक असूनही तिकिटाला नकार, पठ्ठ्यानं बंड पुकारलं, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला धूळ चारली

परभणी जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर, राजकीय पक्ष तयारीला लागले

Mahavikas Aghadi lost TDCC bank election Sahkar Panel win 18 seats

करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.