मोदी सरकार एनडीए सरकार झालं, उद्धव ठाकरे यांचा चिमटा; मोदी सरकारच्या भवितव्यावर मोठी भविष्यवाणी काय ?
या निवडणुकीत जनतेने कौल दिला आहे. आता मोदी सरकार नाही, तर हे एनडीए सरकार आहे. हे सरकार किती दिवस चालेल हा संभ्रम आहे. ते आम्हाला अनैसर्गिक युती म्हणत होते. पण आता त्यांचंच कडबोळं झालंय.
या निवडणुकीत जनतेने कौल दिला आहे. आता मोदी सरकार नाही, तर हे एनडीए सरकार आहे. हे सरकार किती दिवस चालेल हा संभ्रम आहे. ते आम्हाला अनैसर्गिक युती म्हणत होते. पण आता त्यांचंच कडबोळं झालंय. ही युती नैसर्गिक की अनैसर्गिक हा संभ्रम आहे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारवर निशाण साधला. किती दिवस सरकार राहील हे सांगता येत नाही असे नमूद करत या सरकारचं भवितव्य कठीण असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरित्या सुनावलं. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्यांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
विधानसभेत सर्वांना सोबत घेणार
लोकसभा निवडणुकीत मोठी कामगिरी फत्ते केल्याने महाविकास आघाडीकडे मोठे बळ आले आहे. आता विधानसभेची जय्यत तयारी सुरु झाली आहे. हेच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. जेव्हा तीन पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं तेव्हा आमची बैठक झाली आहेत. विधानसभेत सर्वांना सोबत घेणार. इतर घटक पक्षांना सोबत घेणार. राज्यात विधानसभा होणार आहे. इतर राज्यातही विधानसभा आहे. त्यामुळे तिथेही आपल्याला ताकद लावायची आहे. त्यासाठी सर्वांचीच मदत घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
चालुगिरी करायला लागले, तर…
आमचा गुजरातबद्दल राग नाही. उद्या आमचं सरकार आल्यावर आम्ही गुजरातच्या हक्काचं देऊ. पण मोदी आणि शहा गुजरात आणि देशात फळी निर्माण करत आहे. त्यांनी प्रत्येकाला त्याच्या हक्काचं दिलं पाहिजे. त्यालाच केंद्र सरकार म्हटलं जातं. केंद्र सरकार म्हणणं चुकीचं आहे. कारण आपली संघराज्य पद्धत आहे. त्यांना समजायला पाहिजे होतं. संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधानपद दिलं होतं. कसंबसं त्यांचं पंतप्रधानपद वाचलं. किती दिवस सरकार राहील सांगता येत नाही. गुजरातबाबत चालुगिरी करायला लागले, तर त्यांच्या मूळ राज्यातच त्यांना सुरुंग लागेल. नरेटिव्ह म्हणता, ते एका बाजूला आहे. पण यांच्यात खरेपणा नाही. यांचा फोलपणा समोर आला आहे. देशातील जनता जागी झाली. मोदींवर लोकांचा विश्वास होता, आता तो उडाला आहे. आता पुढील निवडणुकीत देशाचं चित्र अधिक चांगलं राहील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.