महाराष्ट्राचा कौल महाविकासआघाडीलाच! सर्व्हेतून महत्त्वाची अपडेट, कोणता पक्ष जिंकणार सर्वाधिक जागा?
आता येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासाआघाडी अशी रंगत पाहायला मिळणार आहे. यात कोण बाजी मारणार हे निवडणुकांचे निकाल लागल्यावरच स्पष्ट होणार आहे.

MahaVikasAghadi Internal Survey Report : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. सध्या सर्वच पक्ष मतदारसंघांची चाचपणी करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे अनेक नेतेही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यातच आता महाविकासआघाडीचा एक अंतर्गत सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेत महाविकासाआघाडीत कोणत्या घटक पक्षाला किती जागा मिळणार याबद्दलही माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रात महाविकासआघाडीकडून अंतर्गत सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेत राज्यात महाविकासआघाडीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सर्व्हेनुसार काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत 85 जागांवर विजय मिळेल, असे बोललं जात आहे. तर पवार गटाला 55-60 आणि ठाकरे गटाला 32 ते 35 जागा मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेसला 80 पेक्षा जास्त जागा मिळणार?
लोकसभा निवडणुकीनतंर महाविकासाआघाडीसाठी राज्यात पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीचा एक अंतर्गत सर्व्हे करण्यात आला होता. आता या सर्व्हेत येत्या विधानसभा निवडणुकी राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला पसंती मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जर निवडणुका झाल्या तर काँग्रेसला 80 पेक्षा जास्त जागा मिळतील, असं बोललं जात आहे.




शरद पवारांकडून नवीन चेहऱ्यांना सधी
तसेच लोकसभेत पवार गटाने १० जागांवर निवडणूक लढली होती. यातील ८ जागांवर त्यांना विजय मिळाला होता. त्यानुसार येत्या विधानसभा निवडणुकीतही पवार गटाचा हाच फॉर्म्युला कायम राहणार असल्याचे बोललं जात आहे. शरद पवार येत्या विधानसभेला नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत पवार गटाचे ५० हून अधिक आमदार जिंकून येऊन शकतात, असे बोललं जात आहे. तर ठाकरे गटाला साधारण 30 ते 35 जागा मिळू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महायुतीत कोणाला किती जागा?
तसेच या सर्व्हेत महायुतीतील शिंद गटाला साधारण ३३ ते ३५ जागा मिळू शकतात, असे बोललं जात आहे. तर अजित पवार गटाला १८, भाजपला ५५ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासाआघाडी अशी रंगत पाहायला मिळणार आहे. यात कोण बाजी मारणार हे निवडणुकांचे निकाल लागल्यावरच स्पष्ट होणार आहे.