खातेवाटपासंदर्भात मोठ्या हालचाली सुरु, फडणवीस-शिंदे-अजितदादांमध्ये महत्त्वाची बैठक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी चहापानासाठी जाणार आहेत. यावेळी या तिघांमध्ये एक बैठक होईल. या बैठकीत हे तिघेही खातेवाटपावर चर्चा करतील

खातेवाटपासंदर्भात मोठ्या हालचाली सुरु, फडणवीस-शिंदे-अजितदादांमध्ये महत्त्वाची बैठक
महायुती
Follow us
| Updated on: Dec 21, 2024 | 9:16 AM

Mahayuti Cabinet Expansion : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर काही माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. आता पुढील काही तासात मंत्रिमंडळाचे खातेवाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आजच महायुती सरकारचे खातेवाटप होणार असल्याचे बोललं जात आहे. पुढच्या काही तासात महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

फडणवीस-शिंदे-अजितदादांमध्ये महत्त्वाची बैठक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी चहापानासाठी जाणार आहेत. यावेळी या तिघांमध्ये एक बैठक होईल. या बैठकीत हे तिघेही खातेवाटपावर चर्चा करतील. या चर्चेनंतर खातेवाटपाबद्दल घोषणा केली जाईल, असे म्हटले जात आहे.

कोणाला कोणतं खातं मिळणार?

महायुती सरकारमध्ये खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. यानुसार भाजपकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ऊर्जा ही चार खाती असणार आहेत. तर शिवसेनेकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं असेल. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीकडे अर्थ खातं आणि उत्पादन शुल्क खातं असेल, अशी माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून महायुतीत तिढा निर्माण झालेले गृहखातं अखेर भाजपला मिळणार असल्याचे बोललं जात आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये गृहखात्यावरुन मोठा वाद झाला होता. मात्र अखेर भाजप स्वत:कडे गृहखाते ठेवण्यास यशस्वी झाली आहे. तसेच शिवसेनेकडे नगरविकास खाते दिले जाणार आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.