महायुतीतील तिन्हीही प्रमुख पक्षांकडून प्रत्येक विधानसभेवर दावा, ‘या’ जागांवर होणार वाद

त्यातच आता महायुतीमधील तिन्ही प्रमुख पक्षांकडून प्रत्येक विधानसभेवर दावा ठोकण्यात आला आहे. त्यामुळे अनेक विधानसभा क्षेत्रात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

महायुतीतील तिन्हीही प्रमुख पक्षांकडून प्रत्येक विधानसभेवर दावा, 'या' जागांवर होणार वाद
ajitdada, eknath shinde and devendra fadnavis
Follow us
| Updated on: Sep 11, 2024 | 2:57 PM

Vidhansabha Election 2024 : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी असा संघर्ष रंगणार आहे. सध्या महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाबद्दल चर्चा सुरु आहेत. त्यासोबतच पक्षांतंर्गत बैठका, गाठीभेटीही पार पडताना दिसत आहेत. त्यातच आता महायुतीमधील तिन्ही प्रमुख पक्षांकडून प्रत्येक विधानसभेवर दावा ठोकण्यात आला आहे. त्यामुळे अनेक विधानसभा क्षेत्रात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

यंदा विधानसभा निवडणुकीत महायुतीत शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काही घटक पक्ष एकत्र लढणार आहे. सध्या महायुतीत मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण यावरुन वाद सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्रि‍पदावर दावा केला आहे. तर भाजपमध्येही काही नेते मुख्यमंत्रि‍पदासाठी इच्छुक असल्याचे बोललं जात आहे. त्यातच आता महायुतीमधील तिन्ही प्रमुख पक्षांकडून बहुतांश विधानसभा मतदारसंघांवर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीत अंतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी महायुती वाद होण्यासारख्या जागा

१) दिंडोरी- नरहरी झिरवाळ विरुद्ध माजी धनराज महाले शिंदे शिवसेना-

२) कागल- हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे (भाजप)

३) चंदगड- राजेश पाटील विरुद्ध शिवाजी पाटील (भाजप अपक्ष)

४) मावळ- सुनील शेळके विरुद्ध बाळा भेगडे

५) इंदापूर- दत्तामामा भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील

६) वडगाव शेरी- सुनील टिंगरे विरुद्ध जगदीश मुळीक (भाजप)

७) हडपसर- चेतन तुपे विरुद्ध नाना भानगिरे (शिवसेना शिंदे)

८) आळंदी- दिलीप मोहिते विरुद्ध विलास लांडे

९) आष्टी- बाळासाहेब आजबे विरुद्ध सुरेश धस (भाजप)

१०) कोपरगाव- आशुतोष काळे विरुद्ध विवेक कोल्हे (भाजप)

११) अर्जुनी मोरगाव- मनोहर चंद्रिकापुरे विरुद्ध माजी मंत्री राजकुमार बडोले (भाजप)

१२) अहिरी- धर्मरावबाबा अत्राम विरुद्ध अमरिश राजे (भाजप)

१३) पुसद- इंद्रनील नाईक विरुद्ध नीलय नाईक

१४) अकोले- किरण लहामटे विरुद्ध वैभव पिचड (भाजप)

१५) येवला- छगन भुजबळ विरुद्ध अमृता पवार (भाजप)

१६) अमळनेर- अनिल पाटील विरुद्ध माजी आमदार शिऱिष चौधरी (भाजप)

१७) सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे विरुद्ध शशिकांत खेडेकर (शिवसेना)

१८) जुन्नर- अतुल बेनके विरुद्ध शरद सोनवणे (शिंदे)

१९) वाई- मकरंद पाटील विरुद्ध मदन भोसले (भाजप)

शिंदे भाजप राष्ट्रवादी वाद निर्माण होऊ शकतील अशा जागा कोणत्या?

२०) साक्री – मंजुळा गावीत (शिंदे) विरुद्ध मोहन सुर्यवंशी

२१) चोपडा- लता सोनवणे (शिंदे) विरुद्ध जगदीश वळवी (राष्ट्रवादी)

२२) जळगाव शहर- सुरेश भोळे (भाजप) विरुद्ध अभिषेक पाटील (राष्ट्रवादी)

२३) एरंडोल- चिमणराव पाटील (शिवसेना) विरुद्ध सतीश पाटील (राष्ट्रवादी)

२४) चाळीसगाव- मंगेश देशमुख (भाजप) विरुद्ध राजीव देशमुख (राष्ट्रवादी)

२५) जामनेर – गिरीश महाजन (भाजप) विरुद्ध संजय गरुड (राष्ट्रवादी)

२६) कारंजा – स्वर्गीय राजेंद्र पाटणी विरुद्ध प्रकाश डहाके (राष्ट्रवादी)

२७) हिंगणघाट- समीर कुणावार (भाजप) विरुद्ध मोहन तिमांडे (राष्ट्रवादी)

२८) वर्धा- पंकज भोयर (भाजप) विरुद्ध शेखर शेंडे (राष्ट्रवादी)

२९) हिंगणा- समीर मेघे (भाजप) विरुद्ध विजयबाबू घोडमारे (राष्ट्रवादी)

३०) उमरेड- राजू पारवे (शिंदे) विरुद्ध सुधीर पारवे (भाजप)

३१) तिरोरा- विजय रहांगडाले (भाजप) विरुद्ध रविकांत बोपचे (राष्ट्रवादी)

३२) किनवट- भिमराव केराम (भाजप) विरुद्ध प्रदीप जाधव (राष्ट्रवादी)

३३) जिंतूर – मेघना बोर्डीकर (भाजप) विरुद्ध विजय भांबळे (राष्ट्रवादी)

३४) बदनापूर- नारायण कुचे (भाजप) विरुद्ध रुपकुमार चौधरी (राष्ट्रवादी)

३५) भोकरदन- संतोष दानवे (भाजप) विरुद्ध चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी)

३६) गंगापूर- प्रशांत बंब (भाजप) विरुद्ध अण्णासाहेब पाटील ( राष्ट्रवादी)

३७) वैजापूर- रमेश बोरनारे (शिंदे) विरुद्ध अभय पाटील (राष्ट्रवादी)

३८) नांदगाव- सुहास कांदे (शिंदे) विरुद्ध पंकज भूजबळ (ऱाष्ट्रवादी)

३९) नाशिक पूर्व- राहुल डिकले (भाजप) विरुद्ध बाळासाहेब सानप (राष्ट्रवादी)

४०) नाशिक पश्चिम- सीमा हिरे (भाजप) विरुद्ध अपूर्व हिरे (राष्ट्रवादी)

४१) मुरबाड- किसन कथोरे (भाजप) विरुद्ध प्रमोद हिंदुराव (राष्ट्रवादी)

४२) उल्हासनगर- कुमार ऐलानी (भाजप) विरुद्ध ज्योती कलाणी (राष्ट्रवादी)

४३) ऐरोली – गणेश नाईक (भाजप) विरुद्द गणेश शिंदे (राष्ट्रवादी)

४४) बेलापूर- मंदा म्हात्रे (भाजप) विरुद्ध अशोक गावडे (राष्ट्रवादी)

४५) दौंड- राहुल कुल (भाजप) विरुद्ध रमेश थोरात (राष्ट्रवादी)

४६) खडकवासला- भीमराव तापकीर (भाजप) विरुद्ध रुपाली चाकणकर (राष्ट्रवादी)

४७) पर्वती-माधुरी मिसाळ (भाजप) विरुद्ध श्रीनाथ भीमाले (भाजप)

४८) श्रीगोंदा- बबनराव पाचपुते (भाजप) विरुद्ध घनश्याम शेलार (राष्ट्रवादी)

४९) गेवराई- लक्ष्मण पवार (भाजप) विरुद्ध विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी

५०) केज- नमिता मुंदडा (भाजप) विरुद्द पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी)

५१) परंडा- तानाजी सावंत (शिंदे) विरुद्ध राहुल मोटे (राष्ट्रवादी)

भाजप विरुद्ध अजित पवार

५२) सिंदेखड – जयकुमार रावल विरुद्ध संदीप बेडसे (राष्ट्रवादी )

विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या जागावाटपाबाबत काय ठरलं?

गेल्या काही दिवसांपासून विधानसभेच्या जागावाटपाबद्दल विविध चर्चा सुरु आहेत. महायुतीत जागावाटपाबद्दल अंतिम निर्णय झाल्याचे बोललं जात आहे. यात भाजप 288 पैकी जवळपास 150 जागा लढवू शकते. तर अजित पवार गटाला 70 जागा मिळू शकतात, असे बोललं जात आहे. मात्र काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, त्यामुळे आम्ही या जागा सोडणार नाही. याशिवाय महाविकासाआघाडीच्या काळातील काँग्रेसच्या वाट्याच्या 10 ते 12 जागाही आम्हाला द्या, अशीही मागणी करण्यात आली.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.