JNPT मध्ये चीनी कंपनीला काम दिल्याचा आरोप, इंटकच्या महेंद्र घरत यांचा आंदोलनाचा इशारा
उरणच्या जेएनपीटी बंदराच्या अखत्यारीतील गेटवे टर्मिनल ऑफ इंडिया नामक बंदरातील क्रेन मेंटेनन्सचे काम चिनी कंपनीला (Chinese company JNPT) दिले जात आहे
रायगड : उरणच्या जेएनपीटी बंदराच्या अखत्यारीतील गेटवे टर्मिनल ऑफ इंडिया नामक बंदरातील क्रेन मेंटेनन्सचे काम चिनी कंपनीला (Chinese company JNPT) दिले जात आहे, असा आरोप इंटकच्या महेंद्र घरत यांनी केला आहे. झेडपीएमसी इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड असं या चीनी कंपनीचं नाव आहे. दरम्यान, गलवाण घाटीत भारतीय सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात चीनच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे (Chinese company JNPT).
येत्या 1 जुलै 2020 पासून जेएनपीटीमध्ये चीनी कंपनीला काम देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र इंटकचे कार्याध्यक्ष महेंद्र घरत यांनी याबाबत आक्षेप घेत चीनी कंपनीला काम देण्याचे कंत्राट त्वरित रद्द करण्यात यावे, अशी मागणी थेट पीएमओ कार्यालय आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
“हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसतं आणि ते वाया जाऊ देणार नाही अशा शब्दात इशारा देत कंपनीने आमचा विरोध डावलून चिनी कंपनीला हे काम दिले तर त्यांचे कामगार कसे काय या ठिकाणी जीटीआयमध्ये येतात तेच बघतो”, असा इशारा घरत यांनी दिला. त्यामुळे आता या कंत्राटाबाबत गेटवे टर्मिनल काय भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
विशेष म्हणचे या बाबतचे पत्र देण्यासाठी इंटकचे कार्यकर्ते जीटीआयमध्ये गेले असता त्यांचे पत्र देखील घेण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे इंटकच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच जीटीआयला धडा शिकविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून थेट पीएमओ कार्यालय आणि मुख्यमंत्री यांना लेखी पत्रही पाठविले आहे.
संबंधित बातम्या :