अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर निवडणुकीच्या रिंगणात, मुंबईतील सर्वात हायव्हॉलटेज मतदारसंघात बाजी कोणाची?

यंदा माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे हे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे अशी लढत माहीम विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदे गट, ठाकरे गट आणि मनसे अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर निवडणुकीच्या रिंगणात, मुंबईतील सर्वात हायव्हॉलटेज मतदारसंघात बाजी कोणाची?
अमित ठाकरे, सदा सरवणकर
Follow us
| Updated on: Oct 23, 2024 | 12:42 PM

Amit Thackeray VS Sada Sarvankar : आगामी निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येणार आहेत. सध्या विविध पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघात बिग फाईट पाहायला मिळणार आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात मनसे विरुद्ध शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढत होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात

मुंबईतील सध्या सर्वाधिक असलेला मतदारसंघ म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघ. सध्या हा मतदारसघ हायव्होलटेज बनला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची ओळख आहे. मात्र आता या मतदारसंघाला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माहीम मतदारसंघात एक तगडा उमेदवार दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. काल जाहीर झालेल्या उमेदवार यादीत याबद्दलची घोषणा करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा सातत्याने रंगत होती. अमित ठाकरेंसाठी मुंबईतील विविध मतदारसंघांची चाचपणीही सुरु होती. सुरुवातीला अमित ठाकरे हे आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवतील असे सांगितले जात होते. त्यानंतर ते भांडुपमधून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे बोललं जात होतं. अखेर अमित ठाकरेंसाठी माहीम विधानसभा मतदारसंघ निश्चित करण्यात आला आहे. काल याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली. यानंतर मनसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने ठाकरे घराण्यातील दुसरा व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे सध्या सर्वांचेच लक्ष माहीम विधानसभेकडे लागले आहे.

महायुतीकडून आमदार सदा सरवणकर यांना तिकीट

तर दुसरीकडे मनसेच्या उमेदवारी यादीपाठोपाठ शिवसेना शिंदे गटाचीही उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. यात माहीम विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आले. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांना ६१ हजार ३३७ मतं मिळाली होती. तर मनसे नेते संदीप देशपांडे ४२ हजार ६९० मते मिळवली होती. यंदा माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे हे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे अशी लढत माहीम विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.

तिरंगी लढत होण्याची शक्यता

त्यासोबतच माहीम विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडूनही उमेदवार दिला जाणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत. जर दादर-माहीम मतदारसंघात आमच्याच परिवारातील अमित ठाकरे निवडणुकीला उभे असतील, तर त्यांचं स्वागत आहे. तरुणांचं राजकारणात स्वागत करावं, अशी आमची परंपरा आणि संस्कृती आहे. दादर माहीम मतदारसंघात शिवसेनेची स्थापना झाली, त्या मतदारसंघात शिवसेना लढणार नाही असे कधी होणार नाही, असे संजय राऊतांनी म्हटले. त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदे गट, ठाकरे गट आणि मनसे अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून माजी महापौर विशाखा राऊत, महेश सावंत यांच्या नावाची चर्चा आहे.

सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.