भिवंडी : भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी परिसरातील कपिल रेयॉन (Major Fire Broke Out At Bhiwandi MIDC) कंपनीला भीषण आग लागली आहे. तब्बल सात तासानंतरही ही आग धुमसत आहे. पाण्याची कमतरता असल्याने पाणी आणण्यासाठी अग्निशामक दलाला 4 किलो मीटर लांब जावं लागत असल्याने आग विझवण्यात अडळथा निर्माण होत होतं. मात्र, अखेर तब्बल 11 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात आली असून सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.
घटनास्थळी भिवंडीसह कल्याण, ठाणे आणि उल्हासनगर अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत (Major Fire Broke Out At Bhiwandi MIDC).
सरवली एमआयडीसीमधील कपिल रेयॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आज पहाटे 3 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत कोट्यवधी रुपयांच्या मशीन, कपडा जळून खाक झाल्याची माहिती आहे. ही कंपनी दोन मजली आहे. पहाटे आग लागल्यानंतर भिवंडी महापालिकेच्या 2 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, पाण्याच्या कमरतेमुळे तब्बल सात तासानंतरही या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं नव्हतं. मात्र, अग्निशामक दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर तब्बल 11 तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
VIDEO : भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी परिसरातील कपिल रेयॉन कंपनीस भीषण आग, घटनास्थळी भिवंडीसह कल्याण, ठाणे, उल्हासनगर अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु pic.twitter.com/IvLU38su7r
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 28, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीला लागलेल्या आगीत, संपूर्ण बिल्डिंगमध्ये आग पसरली आहे. आगीचे लोळ सर्वत्र पसरले असून मोठा भडका उडाल्याचं चित्र आहे. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
आगीमुळी कंपनीतील सामानाचं मोठं नुसकास होऊन कोट्यवधी रुपयांची, मोठी वित्तहानी झाली आहे. आग मोठी असून ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या.
जळगाव शिरसोली रस्त्यावर रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरात जंगलात रात्री अचानक आग लागली. अग्निशमन बंबांसह मोहाडी येथील ग्रामस्थांनीही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. शिरसोली रोडवर रुस्तमजी शाळेलगत जंगलाला अचानकपणे आग लागली. बघता बघता सात ते आठ किलो मीटरपर्यंतच्या जंगलात ही आग वेगाने पसरली .आगीचा प्रकार लक्षात येताच चौधरी नामक व्यक्तीने अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. या दरम्यान मोहाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने ही आग विझविण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. आलेल्या ग्रामस्थांसह तरूणांकडुन झाडाच्या फांद्या तोडून ग्रामस्थांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या चार अग्निशमन बंबाच्या सहायाने आग विझविण्यात आल्याचे समजते. आगीचे नेमके कारण व नुकसानीचा अंदाज समजू शकले नाही. जंगलात वणवा पेटल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
Major Fire Broke Out At Bhiwandi MIDC
संबंधित बातम्या :
छोटीशी आग नंतर शक्तिशाली बॉम्बस्फोट, तब्बल 1100 जणांचा मृत्यू
रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील कचरा प्रकल्पात भीषण आग, अग्निशमन दलाच्या 11 गाड्या दाखल