Pune News : सिंहगड घाटात पर्यटकांना घेऊन जाणारी जीप उलटून भीषण अपघात, 10 ते 12 जण जखमी

पुण्यात आणखी एक अपघात झाल्याचे समोर आले आहे. पुण्यातील सिंहगड घाटात पर्यटकांना घेऊन जाणारी जीप उलटून भीषण अपघात झाला. यामध्ये 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Pune News : सिंहगड घाटात पर्यटकांना घेऊन जाणारी जीप उलटून भीषण अपघात, 10 ते 12 जण जखमी
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 8:15 AM

पुणे | 18 डिसेंबर 2023 : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले अपघातांचे सत्र अद्यापही कायम आहे. कल्याण नगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावच्या हद्दीत भीषण अपघात होऊन ८ जणांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना ताजी असतानाच आता पुण्यात आणखी एक अपघात झाल्याचे समोर आले आहे. पुण्यातील सिंहगड घाटात पर्यटकांना घेऊन जाणारी जीप उलटून भीषण अपघात झाला. यामध्ये 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बरेच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीपचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

घाटरस्ता ठरतोय धोकादायक

सिंहगड घाटरस्ता हा धोकादायक ठरताना दिसत आहे. पर्यटकांना पायथ्यावरून गडापर्यंत आणि पुन्हा खाली नेण्यासाठी जीप वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र हीच वाहतूक आता जीवघेणी ठरताना दिसत आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास काही पर्यटकांना घेऊन एक जीप पायथ्याच्या दिशेन निघाली. मात्र सिंहगड घाट रस्त्यावरील अकरा हजार वळणाजवळ ही जीप उलटली. यावेळी जीपमध्ये बारा ते पंधरा पर्यटक होते. जीप उलटून बरेच जण खाली कोसळले आणि जखमी झाले.

तेथून जाणाऱ्या अन्य वाहनचालकांनी तातडीने वाहने थांबवने अपघातग्रसत जीपमधील पर्यटकांना बाहेर काढले. या अपघाताची माहिती मिळाल्यावर वन विभागाचे अधिकारी तसेच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीपचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेमुळे सिंहगड घाट रस्त्यावरील वाहतूक नियोजन व नियमनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.