मालेगावात 24 तासात 42 नवे कोरोनाग्रस्त, एकाच कुटुंबातील 8 जणांना लागण

एकट्या मालेगावमधील कोरोना रुग्णांची संख्या 661 वर जाऊन पोहचली आहे. (Malegaon Corona Patients Latest Update )

मालेगावात 24 तासात 42 नवे कोरोनाग्रस्त, एकाच कुटुंबातील 8 जणांना लागण
Follow us
| Updated on: May 20, 2020 | 1:38 PM

मालेगाव : मालेगावमध्ये ‘कोरोना’चा कहर सुरुच आहे. गेल्या 24 तासात मालेगावमध्ये तब्बल 42 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये एकाच कुटुंबातील 8 सदस्यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त आतापर्यंत मालेगावात सापडले आहेत. (Malegaon Corona Patients Latest Update)

एकट्या मालेगावमधील कोरोना रुग्णांची संख्या 661 वर जाऊन पोहचली आहे. मालेगाव शहरातील द्याने भागातील एकाच कुटुंबातील 8 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्य सरकारने काल जाहीर केलेल्या चौथ्या लॉकडाऊनच्या नियमानुसार मालेगाव महापालिका क्षेत्र रेड झोनमध्ये येते.

मालेगाव शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मालेगाव तालुक्यातील दाभाडी पाठोपाठ रावळगावमध्येही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला.

हेही वाचा : ईद साधेपणे करुन गरिबांना मदत करा, मनमाडच्या मौलानांचे मुस्लीम बांधवांना आवाहन

मालेगावमध्ये आतापर्यंत ‘कोरोना’मुळे बळी गेलेल्या रुग्णांचा आकडा 40 झाला आहे. तर एकूण 469 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे, तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत चालल्याने दोन दिवसांपूर्वी काहीसा दिलासा व्यक्त करण्यात आला होता.

मालेगाव पाठोपाठ मनमाड शहरातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काल संध्याकाळी आलेल्या अहवालानुसार पहिल्या रुग्णांच्या संपर्कातील तिघा जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मनमाडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 9 झाली आहे.

हेही वाचा : मालेगावात नवे कोरोनाग्रस्त घटले, कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ

मनमाड शहरात आजपासून दारुची दुकाने, वाईन शॉप सुरु होत आहेत. दररोज सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मद्यविक्री सुरु राहणार आहे.

(Malegaon Corona Patients Latest Update)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.