मालेगावात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, रेल्वेच्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांनाही लागण

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला (Malegaon Corona Virus Update) आहे. मालेगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

मालेगावात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, रेल्वेच्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांनाही लागण
Follow us
| Updated on: May 29, 2020 | 10:41 PM

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला (Malegaon Corona Virus Update) आहे. मालेगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज दिवसभरात 14 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ही 765 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे यात 2 रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

मालेगाव शहरासह मालेगाव तालुका ही रेड झोन घोषित करण्यात आला (Malegaon Corona Virus Update) आहे. त्यामुळे मालेगाव तालुक्यातून इतर ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे. मात्र लॉकडाऊनदरम्यान 28 मे पासून इतर गावातून जवळपास 16 हजार 235 जण मालेगाव तालुक्यात आल्याची नोंद आहेत.

मालेगाव तालुक्यात मुंबई, ठाणे, पुण्यातून येणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. या सर्वांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. यातील 45 जणांना इतर आरोग्य समस्या जाणवत असल्याने त्यांच्यावर पुढील उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठवण्यात आले आहे.

तर नांदगाव तालुक्यात बांधकाम करणारे, हातगड्यावर व्यवसाय करणारे अनेक परप्रांतीय मजूर होते. त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले.

नांदगाव तालुक्यातून परप्रांतीय राज्यात परतलेल्यांची आकडेवारी

रेल्वेने परगावी गेलेले परप्रांतिय

  • उत्तर प्रदेश – 106
  • बिहार – 183

बसने राज्यात परतलेले

  • झारखंड – 165
  • गोंदिया – 50

तर नांदगाव तालुक्यातून इतर ठिकाणी गेलेले 49089 ऊसतोड कामगार तालुक्यात परतले आहे. याची माहिती नांदगाव तहसील प्रशासनाने दिली आहे.

संबंधित बातम्या : 

लॉकडाऊन काळात दीड लाखांहून अधिकांचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

Lockdown Effect | इतिहासात पहिल्यांदाच उन्हाळ्यात नागपूरच्या रस्त्यांवर शीतपेयांची दुकानं नाही

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.