VIDEO | पडद्यावर शाहरुख-सलमानची एन्ट्री, प्रेक्षकांची थिएटरमध्येच फटाके फोडून हुल्लडबाजी

मालेगावच्या सेंट्रल चित्रपटगृहातील या गंभीर प्रकाराची पोलिसांनीही दखल घेतली आहे (Malegaon crackers theatre Karan Arjun)

VIDEO | पडद्यावर शाहरुख-सलमानची एन्ट्री, प्रेक्षकांची थिएटरमध्येच फटाके फोडून हुल्लडबाजी
मालेगावात सिनेमागृहात प्रेक्षकांची हुलल्डबाजी
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 12:18 PM

मालेगाव : चित्रपटगृहात शाहरुख-सलमान खानच्या एन्ट्रीला चक्क प्रेक्षकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. मालेगावमधील सिनेमागृहात हा हुल्लडबाजीचा प्रकार पाहायला मिळाला. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे. (Malegaon Fans burst crackers in theatre after Salman Khan Shahrukh Khan entry in Karan Arjun)

मालेगावच्या सेंट्रल चित्रपटगृहात ‘करण अर्जुन’ सिनेमाचा खेळ सुरु होता. यावेळी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि दबंग सुपरस्टार सलमान खान यांची मोठ्या पडद्यावर एन्ट्री झाली. त्यानंतर चाहत्यांचा आनंद शिगेला पोहोचला. टाळ्या-शिट्ट्या यांचा कडकडाट झाला. काही जण उभे राहून जल्लोष करु लागले.

मालेगावच्या सिनेमागृहात हुल्लडबाजी

सिनेमा सुरु असतानाच काही प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करत हुल्लडबाजी केली. मालेगावच्या सेंट्रल चित्रपटगृहातील या गंभीर प्रकाराची पोलिसांनीही दखल घेतली आहे. पोलिसांनी अज्ञात प्रेक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

करण अर्जुन सिनेमाची जादू कायम

करण अर्जुन हा चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि दबंग सुपरस्टार सलमान खान मुख्य भूमिकेत आहेत. तर ज्येष्ठ अभिनेत्री राखी यांनी करण-अर्जुनच्या आईची भूमिका साकारली होती. शाहरुखसोबत काजोल, तर सलमानसोबत ममता कुलकर्णीची जोडी जमली होती.

करण अर्जुन सिनेमाचं कथानक पुनर्जन्मावर आधारित आहे. तब्बल पंचवीस वर्षांनंतरही या सिनेमाची जादू कायम आहे. कोरोनाच्या काळात थिएटर बंद होती. मात्र पुन्हा निर्बंधांसह सिनेमागृह खुली झाली आहेत. त्यानंतर काही नवे सिनेमे रिलीज झाले आहेत. तर काही जुने चित्रपट  पुन्हा प्रदर्शित होत आहेत.

संबंधित बातम्या :

कल्याणमध्ये जेलमधून सुटलेल्या आरोपीचे फटाके फोडत स्वागत, जल्लोषात फरार आरोपीही सहभागी

गजा मारणेच्या ताफ्यातील 300 गाड्यांनी टोल बुडवला; खंडणीचा गुन्हा दाखल होणार

(Malegaon Fans burst crackers in theatre after Salman Khan Shahrukh Khan entry in Karan Arjun)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.