उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी राजकारण पेटलं, दादा भुसे समर्थकांचं थेट संजय राऊतांना आव्हान, आरोप सिद्ध करा अन्यथा थेट संन्यास…
रविवारी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा मालेगाव येथे होत आहे. त्यापूर्वी मालेगावमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून संजय राऊत यांच्या विरोधात दादा भुसे यांचे समर्थक आक्रमक झाले आहे.
मालेगाव ( नाशिक ) : उद्धव ठाकरे यांची कोकणातील जाहीर सभा झाल्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रात जाहीर सभा होणार आहे. रविवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यापूर्वीच मालेगाव मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होण्यापूर्वीच दादा भुसे यांच्यावर संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर दादा भुसे यांनी आरोप सिद्ध करून दाखवा संन्यास घेईल अशी भूमिका घेतली होती. त्यावरून संजय राऊत यांनी मी फक्त खुलासा मागितला होता दादा भुसे यांच्या दाढीला आग लागण्याचे कारण काय असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी मालेगावमध्ये आल्यावर दादा भुसे यांना डिवचलं आहे.
संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्यावर काही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यावरून मंत्री दादा भुसे यांचे समर्थक संजय राऊत यांच्या विरोधात आक्रमक झाले आहे. राऊत यांच्या आरोपावर दादा भुसे यांच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला आहे.
दादा भुसे यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्शवभूमीवर पालकमंत्री भूसे यांच्यावर संजय राऊत यांनी बिन बुडाचे आरोप करू नये असा इशारा दिला आहे. गिरणा कारखाना शेअर्स विषयावरुन भुसे समर्थक आक्रमक झाले आहेत.
संजय राऊत ही जे आरोप करत आहेत त्याचे आम्ही खंडन करतो. मालेगाव शहरात 100 कोटीच्या विकास कामे केली जात आहेत. खराब रस्ते विषयावर हेच विरोधक सोशल मीडिया वर आमची बदनामी करत होते असा टोलाही अद्वय हिरे यांना भुसे समर्थकांनी लगावला आहे.
राऊत यांनी बिनबुडाचे आरोप करू नयेत, त्यांच्याजवळ सबळ पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात जावे आणि उद्या होणाऱ्या सभेत सुद्धा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आरोप करू नयेत अशा इशाराही दादा भुसे यांच्या समर्थकांनी दिला आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांनी विधान सभेत स्पष्ट भाषेत सांगितले की आरोप सिद्ध करा मी राजकारणातून सन्यास घेईल तरीही असे बिन बुडाचे आरोप करू नयेत, आम्ही सिद्ध करायला तयार आहोत तुम्ही तयार आहात का असं खुलं आव्हानही भुसे समर्थकांनी दिले आहे.
अद्वय हिरेंनी यांनी किती पक्ष बदलले, आम्ही तसे पक्ष बदलू नाहीत. आम्ही त्याच पक्षात आहोत. अद्वय हिरेंनी राऊत साहेबांचे कान भरले असून त्या बिनबुडाचे आरोप करून काय फायदा नाही असे दादा भुसे यांच्या कार्यकर्त्यांनी दावा केला आहे.
याशिवाय आता तुम्ही आरोप करत आहात तर आरोप सिद्ध करावे. सिद्ध झाले तर आम्ही सन्यास घेतो नाहीतर तुम्ही संन्यास घ्या असं थेट आव्हानच संजय राऊत यांना दादा भुसे यांच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी मालेगावमधील वातावरण चांगलेच तापले आहे.