राज ठाकरे बोपू… मुस्लिमांना टार्गेट करता; अतिक्रमण काढण्याचे आधीच प्लॅनिंग होतं, एमआयएमच्या आमदाराचा हल्लाबोल काय?
राज ठाकरे हे सत्ताधाऱ्यांचा भोपू बनुन काम करतात. मशिदी वरील भोंग्या संदर्भात न्यायालयाच्या नियमांचे पालन करू असं स्पष्ट सांगत आम्ही आधीच पालन करीत असल्याचा दावाही आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी केला आहे.
मालेगाव ( नाशिक ) : गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंग्याचा मुद्दा लावून धरला आहे. याशिवाय काही अनधिकृत बांधकामाच्या संदर्भातही राज ठाकरे यांनी भूमिका घेतली. त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत असतांना माहीम येथील अनधिकृत दर्गाहवर कारवाई करण्यात आली आहे. त्यावरून एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे मुस्लिम समाजाला टार्गेट करत असल्याचा आरोप करत भोंग्याच्या मुद्द्यावरून आमदार मुफ्ती इस्माईल यांनी राज ठाकरेंना सूनावलं आहे.
मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर आणि नुकतीच माहीम येथे करण्यात आलेल्या कारवाई वरुण राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याशिवाय ही सरकार राज ठाकरे यांना सपोर्ट करत असल्याचे म्हंटले आहे.
भाजपचे लोकं हे राज ठाकरे यांना त्यांच्या पॉलिसी आणि उद्दीष्ट साध्य करण्यासाठी वापर करीत असल्याचे म्हंटले आहे. त्यामध्ये मुंबई शहरात इतरही अतिक्रमण आहेत. त्या संदर्भात न बोलता फक्त मुस्लिमांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी केला आहे.
आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल पुढे म्हणाले, राज ठाकरे हे सत्ताधाऱ्यांचा भोपू बनुन काम करतात. मशिदी वरील भोंग्या संदर्भात न्यायालयाच्या नियमांचे पालन करू असं स्पष्ट सांगत आम्ही आधीच पालन करीत असल्याचा दावाही आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी केला आहे.
सरकार दरबारी कामासाठी इतर कामांसाठी वर्षानुवर्ष चकरा माराव्या लागतात पण त्यांना ते काम दिसत नाही आणि ठाकरे यांच्या इशाऱ्यावरुन लगेच कारवाई केली जाते याच आश्चर्य आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांना वाटलं आहे.
सत्ताधाऱ्यांचं हे प्लॅनिंग असून राज ठाकरे यांना असे मुद्दे दिले जातात. एक राजकीय पार्टी दुसऱ्या राजकीय पार्टी एकमेकांना संपवण्याच्या नादात मुस्लिम समाजाला टार्गेट केले जात आहे. याशिवाय भोंग्याला पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना अधिकार नाहीतर इतरांना काय अधिकार असा सवालही आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरे यांचे हे विचार हिंदू मुस्लिम यांच्या द्वेष आणि दुरी निर्माण करण्याचे काम करत आहेत. राज ठाकरे यांना कळलं पाहिजे की त्यांचे महत्व, पद काय आणि ते करता काय आहेत त्यांनी मुस्लिम समजला टार्गेट करू नये आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल म्हणले आहे.