मतदान गेलं कुठं? गावकरीच वैतागले, महाराष्ट्रातील ‘या’ गावात होणार बॅलेट पेपरवर मतदान

मारकडवाडी हे राज्यातील पहिले गाव असून ज्या गावाने थेट आता बॅलेट वर मतदान घेण्याचे पाऊल उचलले आहे .आता या मतदान प्रक्रियेत विरोधी भाजपचे मतदार सामील होणार का? असा प्रश्न पडला आहे.

मतदान गेलं कुठं? गावकरीच वैतागले, महाराष्ट्रातील 'या' गावात होणार बॅलेट पेपरवर मतदान
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 3:15 PM

राज्यभर ईव्हीएम मशीनवर विरोधक आक्षेप घेत असताना आता मारकडवाडी येथे ३ डिसेंबर रोजी होणार बॅलेट पेपरवर चाचणी मतदान करण्याची मागणी मतदारांनी केली आहे. एकाबाजूला राज्यात झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीचे सर्व नेते EVM मशीनवर आक्षेप घेत आहे. तर दुसरीकडे माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाने आता थेट बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे .

माळशिरस तालुक्यातील या गावात आजवर शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना मोठे मताधिक्य मिळत आले होते. पण यावेळी विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाल्याने जानकर गटाने स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी या गावाने माळशिरस तहसीलदार याना निवेदन देत शासकीय कर्मचारी देण्याबाबत पत्र दिले आहे .

बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव

या निवेदनात मौजे मारकडवाडी मधील चाचणी निवडणूक घेण्यासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत अशी मागणी केली आहे . यात गावात यावेळी झालेल्या मतदानात उत्तम जानकर याना केवळ ८४३ मते तर विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते याना १००३ मते मिळाल्याचे सांगितले आहे . यापूर्वी झालेल्या २००९ , २०१४ , २०१९ या विधानसभा निवडणूक आणि पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावाचे ८० टक्के मतदान जानकर यांच्या गटाला झाल्याचे पुरावे जोडले आहेत . यावेळी निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा आक्षेप घेत हे तपासण्यासाठी पुन्हा ३ डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव गावाने केला आहे . यासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत अशी मागणी करीत संपूर्ण खर्च भरण्यास गाव तयार असल्याचे निवेदन तहसीलदार याना देण्यात आले आहे .

या बॅलेट वरील मतदानासाठी गावात फलक लावून मतदानाप्रमाणे सर्व प्रक्रिया घेतली जाणार आहे . यासाठी लागणाऱ्या मतपत्रिका छापण्यास दिल्या असून गावातील प्रत्येकाने आपण या निवडणुकीत ज्याला मतदान केले त्यालाच मतदान करण्याचे आवाहन केले जाणार आहे . वास्तविक या निवडणुकीत मोहिते पाटील व उत्तम जानकर हे दोन कट्टर विरोधक एकत्र आल्याने शरद पवार गटाला १ लाखापेक्षा जास्त मताधिक्याची अपेक्षा होती . मात्र निवडणूक निकाल येताच जानकर हे केवळ १३ हजार मताच्या फरकाने शेवटच्या टप्प्यात विजयी झाले. यामुळे महादेव जानकर समर्थकांना मशीनवर विश्वास नसल्याची भावना तयार झाली आहे . यातच राज्यातील सर्व नेते मशीनवर शंका उपस्थित करू लागले.

विरोधक सहकार्य करणार का?

मारकडवाडी हे राज्यातील पहिले गाव असून ज्या गावाने थेट आता बॅलेट वर मतदान घेण्याचे पाऊल उचलले आहे .आता या मतदान प्रक्रियेत विरोधी भाजपचे मतदार सामील होणार का? असा प्रश्न पडला आहे. या मतदानाचा पुढाकार गावातील एका गटाने घेतल्याने दुसरा गट आता काय भूमिका घेणार हेही मतदानादिवशी पाहायला मिळणार आहे . या मतदान प्रक्रियेस शासन स्तरावरून कर्मचारी पुरवणे अशक्य असल्याने ग्रामस्थांनी प्रसिद्धी माध्यमांकडून हि मतदान प्रक्रिया पार पडायची तयारी ठेवली आहे . यासाठी ३ डिसेंबर रोजी सकाळी सात ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच चार नंतर मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे . फेरमतदानाची मागणी संपूर्ण गावाने एकमुखी केली असती तर यातून काहीतरी फलित समोर आले असते . मात्र केवळ कमी मताधिक्य मिळाल्याने जानकर गटाने केलेल्या या प्रयोगास गावातील विरोधी गट सहकार्य करणार का हेही आता दिसणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.