Kalyan Crime: एकीला लग्नाचे वचन अन् दुसरीसोबत गाठ बांधण्याच्या तयारीत, कल्याणमधील नवरदेव गजाआड

कल्याण पूर्वेतील शिवाजी कॉलनी परिसरात राहणारा अजय उर्फ विक्की फ्रान्सिस हा कल्याण रेल्वे यार्डमध्ये कामाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याचे एका तरुणीसोबत प्रेम संबंध सुरू होते. ही तरुणी मॅरेज इव्हेंट मॅनेजर आहे. लग्नाचे आमिष दाखवून अजयने या तरुणीसोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले तिचा गर्भपातही केला.

Kalyan Crime: एकीला लग्नाचे वचन अन् दुसरीसोबत गाठ बांधण्याच्या तयारीत, कल्याणमधील नवरदेव गजाआड
एकीला लग्नाचे वचन अन् दुसरीसोबत गाठ बांधण्याच्या तयारीत, कल्याणमधील नवरदेव गजाआड
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 4:47 PM

कल्याण : एकीला लग्नाचे वचन देऊन दुसरीबरोबर लगीनगाठ बांधण्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाच्या कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अजय उर्फ विक्की फ्रान्सिस असे या नवरदेवाचे नाव आहे. अजय हा रेल्वेमध्ये कामाला आहे. अजयचे मॅरेज इव्हेंट मॅनेजर असलेल्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्याने त्या तरुणीला लग्नाचे वचनही दिले होते. मात्र तिची फसवणूक अजयने दुसऱ्या मुलीसोबत लग्न ठरवले. लग्नाच्या तयारीत असतानाच लग्नाच्या काही तास आधी नवरदेवाला कल्याणच्या कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

कल्याण पूर्वेतील शिवाजी कॉलनी परिसरात राहणारा अजय उर्फ विक्की फ्रान्सिस हा कल्याण रेल्वे यार्डमध्ये कामाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याचे एका तरुणीसोबत प्रेम संबंध सुरू होते. ही तरुणी मॅरेज इव्हेंट मॅनेजर आहे. लग्नाचे आमिष दाखवून अजयने या तरुणीसोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले तिचा गर्भपातही केला. लग्नाचे आमिष दाखवून अजय हे कृत्य करत होता. मात्र ही फसवणूक अजयला चांगलीच महागात पडली आहे.

लग्नाच्या काही तास आधी अजयला अटक

अजयने इव्हेंट मॅनेजर प्रेयसीला न सांगताच दुसऱ्या मुलीसोबत लग्न ठरवले. बुधवारी 29 डिसेंबर रोजी अजयचे अमरावती येथील बडनेरामध्ये लग्न होणार होते. याची माहिती अजयच्या पहिल्या प्रेयसीला मिळली. तिने तात्काळ कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत अजय विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणीसह लग्न ठिकाणी धाव घेतली. तरुणीच्या तक्रारीनुसार कोळसेवाडी पोलिसांचे पथक अमरावतीतील बडनेरा येथे दाखल झाले. तेथे अजयच्या लग्नाची तयारी सुरु होती. लग्न अवघ्या काही तासांवर आले असताना पोलिसांनी पहाटे 4 च्या सुमारास अजय फ्रान्सिस याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक इर्शाद सय्यद करीत आहे. (Man arrested for cheating on girlfriend and marrying another girl)

इतर बातम्या

Mumbai Crime | 12 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार, मुंबईत चर्चच्या पाद्रीला जन्मठेप

Mumbai Crime : गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांचे वेशांतर, अखेर सोनसाखळी चोराच्या मुसक्या आवळल्या

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.