नातीवर अत्याचार करणाऱ्या आजोबाला जन्मठेपेची शिक्षा
आजोबांनी नातीवर वारंवार अत्याचार केला. दरम्यान पिडीत बालिकेच्या वडिलांचा आकस्मात मृत्यू झाला. | Rape on child
यवतमाळ: बालवयातच आई-वडीलांच छत्र हरविलेल्या एका 11 वर्षीय नातीवर अत्याचार (Rape) केल्याचा दोष सिध्द झाल्याने आरोपी आजोबाला जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली. येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोईद्दुीन एम.ए. यांच्या खंडपीठाने बुधवारी या प्रकरणाचा निकाल दिला. जीवन रामराव गोडे (काल्पनिक नाव) वय 60 रा. बेलोरा ता. घाटंजी असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. (man sentenced to life imprisonment for raping granddaughter)
उन्हाळ्याच्या सुटीत गेली होती आजोबांकडे
दोषी हे पिडीतेचे आजोबा म्हणजे वडीलांचे वडील आहेत. घटनेच्यावेळी पिडीत बालिका ही 11 वर्षाची होती. 22 ऑक्टोबर 2019 ला फिर्यादी पिडीताची आजी रा. बेलोरा हिने पोलीस स्टेशन घाटंजी येथे पिडीतासोबत येऊन तक्रार दिली. त्यावरून पिडीत बालिकेचे वडील जिवंत असतांना उन्हाच्या शाळेच्या सुटीत मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे पिडीता व तिची लहान बहिण आजोबाकडे एका महिन्यासाठी राहायला गेली होती.
त्याठिकाणी आजोबांनी नातीवर वारंवार अत्याचार केला. दरम्यान पिडीत बालिकेच्या वडिलांचा आकस्मात मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी आजोबा हे पिडीता सोबत बेलोरा येथे राहावयास आले. त्या ठिकाणी देखील आरोपीने नातीसोबत हा घाणेरडा प्रकार सुरुच ठेवला.
पिडीत मुलगी गर्भवती
आजोबांकडून सतत अत्याचार होत असताना पीडिता गर्भवती झाली. पिडीत मुलीने ही गोष्ट आजोबांच्या भीतीमुळे कोणालाही सांगितली नव्हती. शाळेत 15 ऑगस्टच्या दिवशी झेंडावंदनासाठी पिडीता शाळेत गेली व ती चक्कर येवून खाली पडली होती. त्यानंतर सरपंच व पीडितेची आजीने तिची आस्थेने विचारपूस केली. तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पिडीतेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पीडिता गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर घाटंजी पोलिसात गुन्हा नोंद करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले.
सात साक्षीदार आले तपासण्यात
या प्रकरणात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीतेची, तिची आजी, तसेच वैदयकीय अधिकारी व इतर साक्षीदारांचे पुराव्यांनी नोंद झाली. यात महत्वाचे साक्षीदार पिडीता, पिडीताचे वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील नीति दवे यांनी प्रकरण चालविले. तर तपास अधिकारी म्हणून घाटंजी पोलिस ठाण्याचे पी.एस.आय आर के पुरी व किशोर पो. भुजाडे यांनी काम पाहिले.
संबंधित बातम्या:
गळ्यात स्टीलचे पट्टे बांधून गुलाम बनवले, तरुणाने घरात 6 सेक्स स्लेव ठेवले, पोलिसांकडून सुटका
NGO च्या नावाखाली फोनवर संपर्क, वसईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, महिलेला अटक
अभिनेते रवींद्र मंकणी यांच्या मुलाला अटक, पुण्यात सायबर पोलिसांची मोठी कारवाई
(man sentenced to life imprisonment for raping granddaughter)