Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची अचानक बदली, डॉ. संजय मुखर्जी यांची वर्णी

वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी हे आता सिडकोचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष असणार आहेत.

सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची अचानक बदली, डॉ. संजय मुखर्जी यांची वर्णी
Follow us
| Updated on: Aug 18, 2020 | 6:30 PM

नवी मुंबई : सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष लोकेश चंद्र यांची अचानक बदली (Managing Director of CIDCO Lokesh Chandra Transfer) करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी हे आता सिडकोचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष असणार आहेत. लोकेश चंद्र यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली करण्यात आली आहे (Managing Director of CIDCO Lokesh Chandra Transfer).

तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना मंत्रालयात पदोन्नती देण्यात आल्यावर त्यांच्या जागेवर 2018 ला लोकेश चंद्र यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून लोकेश चंद्र यांनी गगराणी यांच्या कार्यकाळातील प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील अडकलेल्या पूर्वनसनला चालना देऊ प्रकल्पाला गती देण्याचा चंद्र यांनी प्रयत्न केला. रखडलेल्या मेट्रो प्रकल्पातील अडचणी दूर करुन संथगती दूर केली.

लोकेश चंद्र यांच्या काळातच सिडकोने 15 हजार घरांच्या महागृहप्रकल्पाचा शुभारंभ केला. तसेच, लोकेश चंद्र यांच्या कारकिर्दीत तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक लाख घरे बांधण्याची घोषणाही केली होती. सिडकोचा कारभार लोकेश चंद्र यांच्यावर असताना काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर कोकण विभागिय आयुक्त पदाचा अतिरीक्त कारभार सोपवण्यात आला होता. परंतू हे कामकाज सुरुळीत असतानाच अचानक लोकेश चंद्र यांची बदली करण्यात आली आहे. बदली करताना त्यांच्या जागेवर नियुक्त केलेले डॉ. संजय मुखर्जी यांच्यासाठी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा दर्जा अधिक कालीन वेतन श्रेणीत अवनत करुन ही बदली करण्यात आल्यामुळे सिडकोमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

डॉ. संजय मुखर्जी हे 1996 च्या आयएएस तुकडीतील अधिकारी आहेत. याआधी वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागाचे ते सचिव होते. मुखर्जी यांनी मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त म्हणून 4 वर्षे काम केले आहे. त्यांच्या काळात त्यांनी भूमिगत जलवाहिन्या, सागरी किनारा मार्ग आणि मलःनिस्सारण प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आले.

Managing Director of CIDCO Lokesh Chandra Transfer

संबंधित बातम्या :

IAS Transfer | मिलिंद म्हैसकर यांच्यासह राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली