एक’नाथ’ है तो सेफ है…!; मुख्यमंत्रिपदाबाबत शिंदे गटाच्या महिला नेत्याचं विधान चर्चेत
Manisha Kayande on Eknath Shinde Maharashtra New CM : एकनाथ शिंदे हेच पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, असा आग्रह शिवसेना शिंदे गटाचे नेते करत आहेत. एक'नाथ' है तो सेफ है...! असं विधान शिंदे गटाच्या महिला नेत्याने केलं आहे. वाचा सविस्तर...
विधानसभा निवडणूक काळात महायुतीकडून वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा दिला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है, तो सेफ है’ अशी घोषणा दिली. यालाच अनुसरून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या. विधान परिषद आमदार मनिषा कायंदे यांनी ‘एक’नाथ’ है तो सेफ हैं’ असं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे ज्या प्रकारे महाराष्ट्राचा गाडा हाकला आणि पुन्हा एकदा शिवसेनेला हिंदुत्वाच्या विचार आणण्याच्या काम केलं. लाडक्या बहिणीच्या भाऊ बनले बहिणींना सुरक्षित वाटते. बहिणींना असा वाटते की हेच मुख्यमंत्री पुन्हा असावे. लाडक्या वहिनीचे भावनेतून आम्ही हा पोस्ट केली एकनाथ आहे तो सेफ आहे, असं शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे.
‘एक’नाथ’ है तो सेफ हैं’
नरेंद्र मोदीजी यांनी जो नारा दिला त्याचा खूप व्यापक अर्थ आहे की सर्व घटकातील लोक असतील. मायनॉरिटीज कोणी असतील. प्रत्येक देशाच्या बाबतीत त्यांनी म्हटलं आहे की एक हे तो सेफ आहे. त्या पुढे जाऊन ‘एक’नाथ’ है तो सेफ हैं’ असं मी म्हणू इच्छिते. कारण एकनाथ शिंदे यांनी योग्यप्रकारे राज्याचा कारभार केला आहे, असं कायंदे म्हणाल्या.
एक “नाथ” हैं तो सेफ हैं…!@mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc @LoksattaLive pic.twitter.com/zUJ5nCjLSK
— Dr.Manisha Kayande (@KayandeDr) November 27, 2024
मुख्यमंत्रिपदबाबत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काय बोलणं झालं होतं. ह मला माहिती नाही. काय ठरलं होतं काय नाही हे मला माहिती नाही. हे मान्य एकनाथ शिंदे यांच्या विषय आहे. परंतु कार्यकर्त्यांची भावना आहे. आणि मला असं वाटत नाही की याच्यामध्ये काही चूक आहे आणि कोणताही तणाव महायुतीमध्ये येणार नाही, असं कायंदे म्हणाल्या आहेत.
संजय राऊतांवर निशाणा
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निवडणूक ही बॅलेट पेपरवर व्हाव्यात अशी मागणी केली आहे. त्यावर संजय राऊत लोकसभेच्या निकाल नंतर त्यांनी हा मागणी केलेली आहे. त्यांना बॅलेट पेपर वगैरे हे काय गंमत वाटते का? ईव्हीएम हे काँग्रेसच्या काळात आलं. लोकसभा राज्यसभेमध्ये निवडणूक लढण्यात जातील हे जेव्हा ठरला तेव्हा लोकसभा मध्ये शिवसेनेचे खासदार पण उभे होते. काल कोर्टाने त्याला फटकारला आहे किती दुटप्पी हा त्यांची वक्तव्य आहे. संजय राऊत त्याला काय टेक्निकल नॉलेज आहे?, असं मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे