डोंबिवलीतील खिंडार राज ठाकरेंनी 24 तासात बुजवले, खंद्या शिलेदाराची नियुक्ती
राजेश कदम यांच्या जागी आता मनोज घरात यांची डोंबिवली शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. (Manoj Gharat Dombivali MNS )
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) ढासळलेले बुरुज पुन्हा उभारताना दिसत आहेत. मनसेच्या डोंबिवली शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरेंनी घरत यांच्यावर जबाबदारी सोपवली. (Manoj Gharat elected as Dombivali MNS City President)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे आणि कार्यक्रम आपण वेळोवेळी आपल्या विभागात निष्ठेने राबवावी आणि यामध्ये आपणाकडून कोणतीही कुचराई किंवा तडजोड स्वीकारली जाणार नाही, याची आपण नोंद घ्यावी. आपण आणि आपल्या सहकाऱ्यांकडून समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही, अशा प्रकारचे आपले वर्तन असेल, अशी अपेक्षा यावेळी मनोज घरत यांना सुपूर्द केलेल्या नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
आपली नेमणूक एक वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. आपला शहर अध्यक्षपदाचा कार्य अहवाल पाहूनच पुढील मुदतवाढीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असंही या पत्रात म्हटलं आहे.
“त्यांचा काहीतरी नाईलाज असेल…”
दरम्यान, कोणी गेलं असेल तरी पक्षाला कोणताही धक्का बसलेला नाही. जे कोणी गेले आहेत, त्यांची काही मजबुरी असेल. जे गेले आहेत ते म्हणत आहेत की आमची मनसे पक्षावर नाराजी नाही, म्हणजे त्यांचा काहीतरी नाईलाज असेल, अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केली.
राजेश कदम यांच्या जागी आता मनोज घरात यांची डोंबिवली शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीत मनसे कशी सत्तेत येईल या उद्देशाने काम करत आहोत, असंही राजू पाटील म्हणाले.
राजेश कदम शिवसेनेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम (MNS Rajesh Kadam joins Shiv Sena) यांच्यासह डोंबिवलीतील असंख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजेश कदम हे ना आमदार आहेत, ना नगरसेवक, तरीही थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर राजेश कदम यांचा पक्षप्रवेश झाल्याने, राजेश कदम यांची कल्याण डोंबिवलीत किती ताकद असू शकते, याचा अंदाज बांधता येईल. साहजिकच राजेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशाने मनसेला मोठा फटका बसणार आहे. (Manoj Gharat elected as Dombivali MNS City President)
मनसेचे माजी विरोधीपक्ष नेते मंदार हळबे
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मनसेचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. मंदार हळबे हे कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे विद्यमान गटनेते आहेत. त्यांनी केडीएमसीमध्ये विरोधी पक्षनेतेपदही भूषवलं आहे. दहा वर्षांपासून ते नगरसेवक आहेत.
मनसेच्या एकमेव आमदारासमोर आव्हानाचा डोंगर
गेल्या 10 वर्षांपासून मनसेने कल्याण डोंबिवली महापालिकेत सक्रिय विरोधी पक्षाची भूमिका बजावली आहे. शिवसेना-भाजप युती तुटण्याआधी महापालिकेचे विरोधी पक्षपद मनसेकडे होतं. 2010 मध्ये मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले होते, तर 2015 मध्ये 9 नगरसेवकच विजयी झाले. 2019 च्या विधानसभेत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे डोंबिवलीतून निवडून आले. त्यानंतर मनसेची ताकद वाढणार असे बोलले जात होते. मात्र मनसेला खिंडार पडल्याने येणाऱ्या निवडणुकीत मनसे आमदार राजू पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.
संबंधित बातम्या :
मनसेला 24 तासात दुसरा झटका, आधी राजेश कदम शिवसेनेत, आता बडा नेता भाजपमध्ये
ना आमदार, ना नगरसेवक, तरीही ‘वर्षा’वर शिवसेना प्रवेश, मनसेला खिंडार पाडणारे राजेश कदम कोण?
कल्याण डोंबिवलीत मनसेचे दोन शिलेदार पक्षाबाहेर, आमदार राजू पाटील घडी कशी सावरणार?
(Manoj Gharat elected as Dombivali MNS City President)