जरांगे पाटील यांच्या रडारवर आता हे तीन नेते, म्हणाले म्हाताऱ्या माणसाचा… वयोमानाने होते…
कायद्याच्या पदावर बसलेले जातीय दंगली घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. एकच माणूस मराठा आरक्षणला विरोध करतात. आरक्षण कोण अडवते त्याचे आधी नाव सांगा. सरकारमध्ये त्यावेळी काही नेत्यांचा दबाव होता. त्यांनी आरक्षण मिळू दिले नाही.
रायगड | 19 नोव्हेंबर 2023 : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यातील सभा महाड येथे झाली. या सभेत बोलताना त्यांनी राजकीय स्वार्थासाठी दोन समाजात झुंज लावण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. आपली जात वाचवा अशी मराठा समाजाला माझी हाक आहे. आपला फोकस आरक्षणावर ठेवायचा. मराठा समाजाने संयम ठेवावा असे आवाहन केले. तर, एकच माणूस मराठा आरक्षणला विरोध करतात. म्हातारे माणसे आहेत. कायद्याच्या पदावर बसलेले जातीय दंगली घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे गनिमी कावे खेळायचे असा इशाराही दिला.
मराठा समाज आरक्षणासाठी खूप दिवसापासून लढतो आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी समिती काम करायला लागली आहे. मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळणार. प्रत्येक गावात शहरात मराठी आरक्षणाचे पुरावे सापडू लागले आहेत. आरक्षण कोण अडवते त्याचे आधी नाव सांगा. नंतर, आरक्षण आठ दिवसानंतर मिळाला तरी चालेल असे जरांगे पाटील म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मी लढत आहे. मला श्रेय नको. पण, मराठा मुलांच्या ओठावर मला हसू बघायचे आहे. आमचे पोर मार्क असूनही घरी बसतात. मराठा समाजाच्या पोराच्या तोंडावर आरक्षण मिळाल्याचे हास्य मला बघायचं आहे. आपण 70 टक्के लढाई जिंकत आलो आहोत. चारी बाजूंनी मराठ्यांना घेरलं आहे. आरक्षण असलेले आणि नसलेले सर्व मराठे सावध व्हा असे आवाहन त्यांनी मराठा कार्यकर्त्यांना केले.
सरकारमध्ये त्यावेळी काही नेत्यांचा दबाव होता. त्यांनी आरक्षण मिळू दिले नाही. तसेच त्या नेत्यांच्या तोंडातून वदवून घेतले. आताचे हे शेवटचे आंदोलन आहे. आता आमची लढायची ताकत राहिली नाही. शांततेत मोठी ताकद आहे. आपण ओबीसी बांधवांशी वाद घालायचा नाही, असे त्यांनी या सभेत बोलताना स्पष्ट केले.
आधी मराठा आरक्षण आणि नंतर राजकारण करा. चारही बाजूने मराठा समाजाला घेरले आहे. ज्याने नोंदी लपवून ठेवल्या ते फक्त सापडु दया. 24 डिसेंबरमध्ये मराठा समाजाला कायदा करून आरक्षण देण्यात येणार आहे. नोंदी आढळल्या म्हणून आता मराठा समाज एकत्र आला आहे. म्हाताऱ्या माणसाचा तोल जात असतो. वयोमानाने होते तसे. त्यांना समजून घेत चला, असा जळजळीत टोला त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना नाव न घेता लगावला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी कोकणातील मराठे कुणबी समाजात मोडत नाहीत. तसे प्रमाणपत्र घेणार नाहीत असे म्हटले होते. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठामध्ये जमत नाहीत. आता महाडमध्ये येऊन बघा. लढाया खूप लढल्या. पण, यश जवळ आले कि ते हुकायचे. आता प्रत्येकाला ही लढाई आपल्या लेकरांची वाटत आहे असे म्हणत या दोन्ही नेत्यांवर टीका केली.