20 जानेवारीला मुंबईत भगवं वादळ; मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईकरांना कळकळीचं आवाहन काय?
20 जानेवारीला अंतरवाली सराटी ते मुंबई असा पायी प्रवास करून मनोज जरांगे मुंबई गाठणार आहेत. मुंबईत भगवं वादळ धडकणार आहे. यामुळे मुंबईकरांची कोंडीही होणार आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी मुंबईकरांना कळकळीचे आवाहन केले आहे.
मुंबई : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आणि छगन भुजबळ यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र आणि सरसकट आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील आग्रही आहे, तर दुसरीकडे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या असं छगण भुजबळ वारंवार सांगत आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दोघांचेही एकमेकांवर शाब्दिक हल्ले सुरू आहे. नुकतीच मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी छगन भुजबळांवर आपल्या खास शैलीत टोलेबाजी केली. ‘लैच कामातून जायचं अंदाज दिसतो. सुसंस्कृत पणा तुमच्याकडून काय शिकवा? आता तुम्ही सुधारा. माणूस पागल होईल अस वाटायलं. तुम्ही मला संस्कृती शिकवाल? कोयते कुऱ्हाडी काढणारे. काय संस्कृती आहे तुम्हाला? धनगर समाजाचा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करा. आता कागद खाईल हा माणूस.’ असं जरांगे पाटील म्हणाले.
भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणार नाही
सरकारणं सांगितलं कायदा पारित करायला वेळ द्या. आम्ही नोंदी कायदा पारित करण्यासाठी 40 दिवस दिले. मात्र सरकारकडून कुठलाच निर्णय झाला नाही. आता आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे. मी 20 जानेवारीला मुंबईला पायी निघणार आहे. 25 डिसेंबरला निघालो असतो तर दोन दिवसांता परत आलो असतो. भावनेच्या आहारी जाऊन काही निर्णय घेऊन समाजाची फसगत करायची नाही. तिथ जाऊन जिंकून यायचं आहे. असं मनोज जरांगे म्हणाले.
मुंबईकरांना मनोज जरांगेंचं आवाहन
20 जानेवारीला अंतरवाली सराटी ते मुंबई असा पायी प्रवास करून मनोज जरांगे मुंबई गाठणार आहेत. मुंबईत भगवं वादळ धडकणार आहे. यामुळे मुंबईकरांची कोंडीही होणार आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी मुंबईकरांना कळकळीचे आवाहन केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांचं मुंबईकरांनी स्वागत केलं पाहिजे असं मनोज जरांगे म्हणाले. मुंबईकरांनी आम्हाला ग्लास भरून पाणी दिलं पाहिजे. मुंबईकर आमचं गाऱ्हाणं करणार नाही असं ही ते म्हणाले. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावरही त्यांनी टिपणी केली. मागास आयोगाने जाचक अटी लावण्याचं कारण नाही असं मनोज जरांगे म्हणाले.