अखेर मनोज जरांगे पाटलांनी समीकरण जुळवलं; मराठा, दलित, मुस्लीम एकत्र, बैठकीत काय ठरलं?

आज अतंरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची मुस्लीम आणि बैद्ध धर्मगुरूंसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.

अखेर मनोज जरांगे पाटलांनी समीकरण जुळवलं; मराठा, दलित, मुस्लीम एकत्र, बैठकीत काय ठरलं?
मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 2:55 PM

अंतरवाली सराटीमधून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मुस्लीम धर्मगुरू, बौद्ध धर्मगुरू आणि दलित नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मुस्लीम, दलित, मराठा समीकरणावर एकमत झालं असून, मराठ, दलित आणि मुस्लीम एकत्र आल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर बंजारा समाज आणि ओबीसी समाजासोबतही चर्चा करणार असल्याचं यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील? 

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवाली सराटीमध्ये मुस्लीम आणि बौद्ध धर्मगुरू तसेच दलित नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी मोठी घोषणा केली आहे. मुस्लीम, दलित, मराठा समीकरण जुळलं, मराठा, मुस्लीम आणि दलित एकत्र आले असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, अन्यायाचं संकट आम्हाला परतवून लावायचं आहे, आता गुलामगिरीत जगायचं नाही म्हणजे नाही.  बंजारा समजा आणि ओबीसी समाजासोबतही चर्चा करणार आहे.  कोणत्या जागा लढवायच्या आणि किती जागा लढवायच्या याबाबत येत्या तीन तारखेला निर्णय घेणार आहे.  आम्ही सर्व जागा लोकशाही मार्गानं लढणार  आहोत. कोणाचीही दादागिरी आणि गुंडगिरी चालू देणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आमच्या देवेंद्र तात्यांनी मला लक्ष केलं. राजकारणाच्या वाटेवर नेऊ नका सांगत होतो,  त्यांनी नेलं. आता माझा कोणी विरोधक नाही. मी लोकशाही मार्गाने जात आहे. आम्हाला तुमच्या वाटेनं जायचं नाही. पण आडवा आला तर सोडणार नाही. तुमचा एक कागद आला तरी माणूस मोकळा जाऊ देणार नाही. कुणाचीही जात पाहात नाही.  मला एखादा कागद आला तर एका फोनवर मी त्यांचं काम करतो. दलित, मुस्लीम असो की धनगर असो प्रत्येकाचे काम करतो. मी जात कधीच पाहत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.