ते मला गावठी समजत होते, पण त्यांना…; मनोज जरांगेंच्या जाहीर सभेत विधानाने चर्चाच चर्चा

Manoj Jarange Patil on Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज परभणीत आहेत. इथं बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनावर भाष्य केलं आहे. काहीही झालं तरी मागे हटायचं नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली. वाचा सविस्तर......

ते मला गावठी समजत होते, पण त्यांना...; मनोज जरांगेंच्या जाहीर सभेत विधानाने चर्चाच चर्चा
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 6:22 PM

छगन भुजबळ आतापर्यंत ओबीसी मतदानाची भीती दाखवत होता. त्याला आता कळलं मराठा मत काय आहे. ते मला गावठी समजत होते, गावठ्याने कसा हिसका दाखवला. राज्याने पाहायला परभणीचां मराठा समाज कसा एकवटला आहे ते… मराठ्यांच्या पोरांसाठी ताकदीने परभणीकर एकवटले आहेत, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठवाडा दौऱ्या दरम्यान मनोज जरांगे पाटील आज परभणीत आहेत. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी सरकारला त्यांनी इशारा दिला. तसंच मराठा नेत्यांनाही एकत्र येण्याचं आवाहन जरांगेंनी केलं आहे.

सर्व पक्षाच्या मराठा नेत्यांना माझी विनंती आहे. पक्षांचा ऐकून मुलांची माती करू नका. मी निष्ठा सोडणार नाही, सरकारला मॅनेज होणार नाही. माझी तुमच्याकडून अपेक्षा एकजूट मोडू देऊ नका. तुम्हाला हात जोडून विनंती ओबीसींच्या लोकांवर हात उगरू नका. ओबीसी ना ही विनंती मराठ्यांच्या अंगावर जाऊ नका. मात्र ओबीसी नेत्यांना पाडा… मराठ्यांनी एकजुटीने मतदान केले तर जातीवादी म्हणता. तुम्ही एकजुटीने मागणी केली. मतदान केले आम्ही कधी तुम्हाला जातीवादी म्हणलो नाही. मी माझ्या समाजासाठी कट्टर आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आरक्षणावर जरांगे काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितला होत पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो. आमच्या आया बहिण्याचे डोकी फोडली. सगळा माळी समाज आरक्षणात घातला. मराठ्यांचा धंदा शेती आहे. देवेंद्र फडणवीससाहेब तुम्ही छगन भुजबळांचा ऐकून गुन्हे मागे घेतले नाहीत. उलट एक लाख केसेस अजून आमच्यावर टाकलेत, असंही मनोज जरांगे म्हणालेत.

मराठा नेत्यांना काय आवाहन?

भाजपमधील मराठा नेत्यांनी फडणवीस साहेबांना सांगावं की, मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका. आम्हाला देवेंद्र फडणवीसांवर बोलायची काही गरज नाही. भाजप नेत्यांना विनंती मराठ्यांच्या पाठीमागे उभे राहा. नाहीतर मराठे निवडणुकीत काय करतील पाहा…, असा इशाराच मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

मी तुम्हाला माय बाप मानले, लेकरू म्हणून माझ्या डोक्यावर हात ठेवा. आरक्षणाचां गुलाल पडेपर्यंत थांबत नाही. माझ्या मराठा समाजाच्या मुलाला मोठं केल्याशिवाय शांत बसणार नाही. मी गद्दार म्हणून मारणार नाही, तुमच्या पायावर मरणार आहे. तुमची ताकत वाया जाऊ देणार नाही, असा शब्दही मनोज जरांगेंनी यावेळी दिला.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.