आघाडी आणि महायुतीच्या नाराजांना उमेदवारी देणार का?; मनोज जरांगे यांनी काय सांगितलं?

मी भीमाशंकरला निघालोय आहे. आज दुपारी 2 वाजता दर्शन घेईन. आमचा दौरा गेल्या आठवड्यात ठरला होता. काल रात्री समजलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही येतायेत. मात्र त्यांची वेळ मला माहीत नाही. आम्ही आमच्या नियोजनानुसार जाणार आहोत. भीमाशंकर चरणी आरक्षणासाठी साकडं घालू, भीमाशंकर या सरकारला सद्बुद्धी देईल, असं मनोज जरांगे म्हणाले. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही. देवाच्या दारात थोडी अशी चर्चा करतात? चर्चा ही मुंबईलाचं होऊ शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आघाडी आणि महायुतीच्या नाराजांना उमेदवारी देणार का?; मनोज जरांगे यांनी काय सांगितलं?
मनोज जरांगे
Follow us
| Updated on: Sep 02, 2024 | 1:00 PM

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. जरांगे कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. उमेदवारी मिळावी म्हणून अनेकजण मनोज जरांगे यांना भेटतही आहेत. इच्छुकांचे सुमारे हजार तरी अर्ज जरांगे यांच्याकडे आले आहेत. जरांगे महाविकास आघाडी आणि महायुतीतील इच्छुकही उमेदवारीसाठी येत आहेत. दोन्ही आघाड्यातील या नाराजांना जरांगे पाटील तिकीट देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच जरांगे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. महायुती आणि मविआमधील नाराजांना आम्ही आमच्या सोबत घेणार नाही. त्यांना सोबत घेऊन आमच्यातल्या इच्छुकांचं आम्ही काय करू? असा सवाल करतानाच विधानसभा लढायचं ठरलं तर उमेदवारांची नावं समाजासमोर ठेवणार आहे. मग समाजाने ठरवावं. आमची एकजूट असल्यानं कोणी कोणाचे पाय खेचनार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

मला मुख्यमंत्री व्हायचं नाही

मला मुख्यमंत्री व्हायचं नाही. माझी ती इच्छा नाहीच. तसं असतं तर जाहीर केलं असतं. इतरांना म्हटलं असतं तुम्ही आमदार व्हा. मला माझा स्वार्थ पाहायचा नाही, समाजासाठी लढायचं आहे. सरकारला आमची विधानसभेची भूमिका पहायची होती, पण त्यांनी निवडणुका पुढं ढकलल्या. मग आम्हीपण आमचा निर्णय पुढं ढकलला आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

मराठ्यांची फडणवीस यांच्यावर नाराजी

विधानसभेला कोण टार्गेट असेल हे आताच सांगणार नाही. लोकसभेला समाजाने ताकद दाखवून दिली आहे, विधानसभेतही दाखवू. राज्यभर दौरे सुरू आहेत. या दरम्यान समाजासोबत विधानसभेबाबत चर्चा करत नाही. मुळात आमच्याकडे उमेदवारचं उमेदवार आहेत. निवडणूक लढण्याची इच्छा असणारे राजकीय नेते मला भेटायला येतात. मीडिया निघून गेल्यावर ते माझ्याकडे येतात. आम्ही 10वर्षे कामं करतोय अन् तीन पक्ष एकत्र आलेत. मग आमचं काय होणार? आम्हाला हे घराणं नको, असं हे नेते सांगत आहेत. एक म्हणतो, हे घराणं नको तर दुसरा म्हणतो, ते घराणं नको. भाजपमधील मराठ्यांची तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप नाराजी आहे, असा दावाही त्यांनी केला.

मी राजकीय बोलणारच

देवेंद्र फडणवीस आमचे विरोधक नाहीत अन् शत्रूही मानलेले नाही. फक्त मराठ्यांचा द्वेष करण्याची वागणूक त्यांची चांगली नाही. ते मराठेच मराठ्यांच्या अंगावर सोडतात. फडणवीस हे कोणत्याच मंत्र्याला अन् आमदारांना काम करू देत नाहीत. अगदी आरक्षणाबाबतही बोलू देत नाहीत. फडणवीस साहेब मी आज सांगतो, मला राजकारणात जायचं नाही. आमच्या समाजालाही राजकारणात जायचं नाही. पण आरक्षण दिलं नाही तर मी राजकीय बोलणार म्हणजे बोलणारच, असा इशारा त्यांनी दिला.

ते होऊ देणार नाही

राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, याची सखोल चौकशी व्हावी. फक्त याचं राजकारण करू नका. आरडाओरडा करून तुम्ही आरक्षणाचा विषय मागे पाडण्याचा डाव करत असाल तर ते आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

दाजी तर चिखलात काम करून मेला

लाडकी बहीण योजना आणली, ही चांगलीच. पण आरक्षणाचे काय? दाजी तर चिखलात काम करून मेला की. त्याचं काय? हे फक्त नादी लावतात. बरं हे सगळं आमच्या करातून सुरू आहे. कर्तव्यदक्ष सरकार आमचेच पैसे आम्हाला देतंय, असं ते म्हणाले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.