‘माझं डोक पिसाळलं तर…’ मनोज जरांगे पाटील कुणावर भडकले?; असं काय घडलं?

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचं काल अपहारण झालं होतं. त्यानंतर त्यांची हत्या करून मृतदेह फेकून देण्यात आला. या घटनेनंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे.

'माझं डोक पिसाळलं तर...' मनोज जरांगे पाटील कुणावर भडकले?; असं काय घडलं?
Follow us
| Updated on: Dec 10, 2024 | 8:57 PM

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचं काल अपहारण झालं होतं. त्यानंतर त्यांची हत्या करून मृतदेह फेकून देण्यात आला. त्यानंतर आता बीडमध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मस्साजोग गावातील नागरिकांनी बीड-लातूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं, आंदोलकांना पोलिसांनी हटवण्याचा प्रयत्न केला असता या आंदोलनाला हिंसक वळण लागलं, नागरिकांनी एक एसटी बस पेटवल्याची देखील माहिती समोर येत आहे.

दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या सर्व पार्श्वभूमीवर मस्साजोग गावाला भेट दिली, त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला. या हत्याकांडावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे.  आम्ही सीआयडी चौकशी करतो असा निरोप आला आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, आम्ही सरकारी वकील देणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा एफआयआर चुकीचा झाला आहे. दोन पोलिसाचं निलंबन करायला हवं, त्यांनी  302 चं कलम लावायला पाहिजे होतं. आरोपींना अटक व्हायरला पाहिजे. त्या दोन्ही पोलिसांचं निलंबन व्हाव.

आता तर हत्या झाली आहे, ही परिसीमा आहे. माज करू नका हे खूप वाईट आहे. एकदा जर  मराठे बिथरले तर समाज मोठा उठाव करेल. हत्या होऊनही आमचे लोक संयमात आहेत.   भविष्याचा तुम्ही विचार करा, जातीवाद होवू देवू नका, आम्ही जातीचा रंग दिलेला नाही. माझं डोकं पिसाळलं तर मी कोणाचं ऐकणार नाही असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

नेमकं काय घडलं? 

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. आधी त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार असून कोणालाही सोडणार नाही असं बीडच्या पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.