पंकजा मुंडे यांचा कट्टर समर्थक राजीनामा देऊन अंतरवलीत, जरांगे यांच्यासोबत खलबतं; बीडमध्ये खेला होबे?

मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेनंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठा बदल होताना दिसत आहे. अनेक पक्षातील नेते त्यांची भेट घेत आहेत. भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी पदाचा राजीनामा देऊन जरांगे यांची भेट घेतली, त्यामुळे बीडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. म्हस्के यांच्यासोबत अनेक इतर नेतेही जरांगे यांच्याकडे आकर्षित झाले आहेत, त्यामुळे बीडमधील राजकारणात एक नवीन अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे यांचा कट्टर समर्थक राजीनामा देऊन अंतरवलीत, जरांगे यांच्यासोबत खलबतं; बीडमध्ये खेला होबे?
पंकजा मुंडे यांचा कट्टर समर्थक राजीनामा देऊन अंतरवलीत
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 1:26 PM

मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीबाबतची आपली भूमिका जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण वाऱ्यासारखं बदलताना दिसत आहे. मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अनेक पक्षातील लोकांच्या रांगा लागल्या आहेत. काही भर दिवसा भेटत आहेत तर काही मध्यरात्री येऊन खळबतं करत आहेत. यात आमदार आणि माजी आमदारांचाही समावेश आहे. मनोज जरांगे यांनी आपल्याला बळ द्यावं म्हणून हे नेते एकवटले आहेत. त्यामुळे जरांगे कुणाच्या पदरात तिकीट टाकतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेल्या नेत्याने पदाचा राजीनामा देऊन जरांगे यांची भेट घेतली. त्यामुळे बीडमध्ये यंदा मोठी उलथापालथ होणार का? अशी चर्चा रंगली आहे.

भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. राजेंद्र म्हस्के हे पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक मनाले जातात. म्हस्के हे गेली सहा वर्ष बीड भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी बीड जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिलंय. राजेंद्र म्हस्के बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. काल जरांगे पाटील यांनी त्यांचे उमेदवार येत्या विधानसभेत उभे करणार असल्याची घोषणा केल्यानंतर आज राजेंद्र म्हस्के यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

बीडमध्ये खेला होबे?

बीडमध्ये वंजारी समाज आणि मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये मोठी उलथापालथ करण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपच्या नेत्याने मनोज जरांगे यांची भेट घेतल्याने मनोज जरांगे यांच्या डावाला बळ मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे जरांगे म्हस्के यांना उमेदवारी देणार का? दिल्यानंतर बीडमधील राजकीय गणितं कशी होतील? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नेतृत्वाने शब्द दिला

जरांगे यांची भेट घेतल्यानंतर राजेंद्र म्हस्के यांनी मीडियाशी संवाद साधला. भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेल्या सहा वर्षापासून जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो. मी काल कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. त्यात निर्णय झाला की भारतीय जनता पक्षाचा राजीनामा द्यायचा. मागच्या निवडणुकीत बीड विधानसभेसाठी आम्ही इच्छुक होतो, युतीमध्ये ती जागा शिवसेनेला सुटली. त्यावेळी आम्हाला थांबावं लागलं. तुम्हाला विधानसभा लढवायची आहे, असं नेतृत्वाने एक वर्षांपूर्वी सांगितलं होतं. परंतु परिस्थिती बदलली आहे. मतदारसंघाकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे, असं राजेंद्र म्हस्के म्हणाले.

जरांगे फॅक्टर चालणार

आज मनोज जरांगे यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या कानावर टाकला. काल त्यांनी बैठक घेऊन निर्णय घेतला. त्या अनुषंगाने त्यांना माहीत असावं यासाठी त्यांची भेट घेतली. इच्छुकांनी अर्ज करावेत असं जरांगे पाटील म्हणाले होते, म्हणून मी त्यांच्याकडे मागणी केली आहे. विधानसभेला जरांगे फॅक्टर नक्की चालणार आहे, विधानसभेला अधिक प्रभावीपणे तो चालेल, असा दावा म्हस्के यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.