Mansoon Rain Update : मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस, कोल्हापूरमध्ये 60 गावांचा थेट संपर्क तुटला

राज्यभरात अनेक ठिकाणी मान्सून पाऊस मुसळधार कोसळत आहे. मुंबईतही बर्‍याच भागात मुसळधार पाऊस पडतोय (Mansoon rain updates Mumbai Kolhapur).

Mansoon Rain Update : मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस, कोल्हापूरमध्ये 60 गावांचा थेट संपर्क तुटला
Follow us
| Updated on: Jun 18, 2020 | 1:24 PM

मुंबई : राज्यभरात अनेक ठिकाणी मान्सून पाऊस मुसळधार कोसळत आहे. मुंबईतही बर्‍याच भागात मुसळधार पाऊस पडतोय (Mansoon rain updates Mumbai Kolhapur). उपनगरीय भागातील बोरिवली आणि कांदिवली येथेही मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईतील बोरिवली, कांदिवली, मालाड या भागात दमदार पाऊस झाला. कांदीवलीतील (गणेशनगर) जूना लिंक रोडवर पावसाने थेट गटाराचं पाणी रस्त्यावर आलं आहे. वसई विरार नालासोपारामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. यानंतर आता येथे अधूनमधून रिमझिम पाऊस पडत आहे.

दुसरीकडे कोल्हापूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने जवळपास 60 गावांचा थेट संपर्क तुटला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. आतापर्यंत 25 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे 60 गावांचा थेट संपर्क तुटला. पंचगंगा नदीची पाणीपातळी 25 फुटांवर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 12 धरण क्षेत्रांमध्ये 24 तासात अतिवृष्टी झाली. कोल्हापूर शहरात मात्र पावसाची उघडीप मिळाली. दुसरीकडे गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यात अतिवृष्टी झाली.

नंदूरबारमधील सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने अनेक नदी नाले प्रवाहित झाले. सुसरी नदीला आलेल्या पुरात सुसरी नदीवर सुरु असलेल्या पुलाच्या बांधकामांचे साहित्य देखील वाहून गेले. या ठिकाणी असलेला जेसीबी (JCB) आणि मोठ्या क्रेन पुराच्या पाण्यात अडकून पडल्या. पुरामुळे ठेकेदाराचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या 3 दिवसांपासून सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. या ठिकाणी उगम पावणाऱ्या नदी नाल्यांच्य पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदी काठावरील नागरिकांना प्रशासनाच्यावतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदी नाल्याच्या पात्रात उतरु नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलं आहे.

मागील 2-3 दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस पडत आहे. या पावसाचा सर्वात जास्त फटका हा संगमेश्वर परीसरात बसला. त्यामुळे या परिसरात नदी नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. याचवेळी मुंबई-गोवा मार्गावरील शास्त्रीपूल येथील पिकअप शेडमागील दरड कोसळल्याने 3 घरांना धोका निर्माण झाला. या घरातील नागरिकांचं तात्काळ स्थलांतर करण्यात आले. त्याच परिसरातील इतरांना घर खाली करुन इतरत्र राहण्यास जाण्याच्या सूचना महसूल विभागामार्फत करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

Raju Shetti Upset | घरच्या कटारीचे घाव जिव्हारी, नात्यात अंतर पडत असेल तर विधानपरिषदेची ब्याद नकोच, राजू शेट्टी उद्विग्न

Congress Meeting CM | काँग्रेसच्या नाराज मंत्र्यांना अखेर मुख्यमंत्री भेटीची वेळ मिळाली

Pune Corona : पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, एकाच दिवशी 550 रुग्ण

Mansoon rain updates Mumbai Kolhapur

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.