जगभरात लसीचं स्वागत पण नागपूरच्या डॉक्टरांना कशाची भीती ?

नागपूरमधील इंडियन मेडिकल असोसिएशनचे 30 टक्क्यांहून अधिक डॉक्टर्स लस घेण्यास तयार नसल्याची माहिती समोर आली आहे. ( IMA Doctors Corona Vaccine)

जगभरात लसीचं स्वागत पण नागपूरच्या डॉक्टरांना कशाची भीती ?
कोरोना लस प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 11:58 AM

नागपूर: ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिकेत फायझर कंपनीच्या कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापर करण्यास मंजुरी देण्यात आलीय. भारत सरकार देखील लसीकरणासाठी प्लॅन तयार करत आहे. कोरोनावरील लस आल्यानंतर लस पहिल्यांदा आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील लोकांना देण्याबाबत चर्चा सुरु आहेत. मात्र, नागपूरमधील इंडियन मेडिकल असोसिएशनचे 30 टक्क्यांहून अधिक डॉक्टर्स लस घेण्यास तयार नसल्याची बाब समोर आली आहे. (Many IMA Doctors at Nagpur not ready to take Corona vaccine)

कोरोना लसीच्या स्वागतासाठी संपूर्ण जग सज्ज आहे, पण तरी आरोग्य यंत्रणेचा कणा माणले जाणारे अनेक डॉक्टर्स ही लस घेण्यास फारसे इच्छूक नाहीत. नागपुरातील इंडियन मेडिकल असोसिएशनचे 30 टक्क्यांहून जास्त डॅाक्टर्स ही लस घेण्यास तयार नाहीत. कोरोना लसीबाबत शंभर टक्के खात्री नसल्याने डॉक्टर्स या लसीबाबत निरूत्साही असल्याचं चित्र आहे.

कोरोनाशी लढण्यासाठी देश विदेशातील मिळून एकूण 30 वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसी चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. यात भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सीन लसीच्या तिसऱ्या मानवी चाचणीची सुरुवात नागपुरात झालीय. एक हजार स्वयंसेवकांना ही लस दिली जाते आहे. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ची कोव्हिशील्ड लसीची तिसरी चाचणी सुद्धा नागपुरात सुरू आहे. 50 स्वयंसेवकांना ही लस देण्यात आलीय. मात्र, नागपुरातील अनेक डॉक्टर्स ही लस घेण्याबाबत निरूत्साही आहेत. (Many IMA Doctors at Nagpur not ready to take Corona vaccine)

डॉक्टर्स लसीबाबत निरूत्साही असल्याची कारणे

नागपूरमधील डॉक्टरांमध्ये कोरोना लसीबाबत निरुस्ताह असल्याची काही कारणे आहेत. घाईघाईत विकसित केलेली लस, लसीच्या गुणवत्तेवर अद्यापही साशंक वातावरण, लसीची मानवी चाचणी फार कमी कालावधीची, लसीच्या दुष्परिणाबाबत कुठलाही ठोस उपचार नाहीत, ही यामागची कारणे आहेत, असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. महाजन यांनी दिली.

निकष पूर्ण झाल्यावरच प्रतिबंधात्मक लस घेण्यावर डॉक्टरांचा भर दिसतोय. त्यामुळं जोपर्यंत ही लस लस शंभर टक्के निकषावर खरी ठरत नाही. तोपर्यंत या लसींबाबत डॉक्टर्सचं साशंक असतील तर तर सर्वसामान्यांचा विश्वास कसा बसणार हा प्रश्न निर्माण होतो. (Many IMA Doctors at Nagpur not ready to take Corona vaccine)

काय आहे नागपूरच्या डॉक्टरांचे मत?

सीरम-भारत बायोटेकला सविस्तर माहिती देण्याचे निर्देश

भारतात प्रामुख्यानं सीरम आणि भारत बायोटेक या कंपन्या लसीवर संशोधन करत आहेत. या दोन्ही कंपन्यांनी केंद्र सरकारकडे लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली होती. मात्र, केंद्र सरकारच्या आरोग्य समितीनं दोन्ही कंपन्याना लसींबाबत सविस्तर माहिती उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य समितीने सीरम आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांकडून सविस्तर माहिती मागवली आहे. त्यानंतरच लसींच्या आपातकालीन वापरासाठी केंद्र सरकारकडून परवानगी दिली जाईल, असे संकेत मिळत आहेत.

या समितीकडे लसीला मंजुरी देण्याचे अधिकार नाहीत. मात्र, ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (DCGI) या समितीच्या शिफारसी विचारात घेतल्या जातात. त्यामुळे लसीला मंजुरी द्यायची की नाही, हा निर्णयदेखील या विशेष समितीच्या शिफारशीआधारेच घेतला जाईल. (Many IMA Doctors at Nagpur not ready to take Corona vaccine)

सविस्तर बातम्या:

मोदी सरकारचा सीरम कंपनीशी करार; कोरोनाची लस अवघ्या 250 रुपयांत मिळणार

सीरम-भारत बायोटेकने लसीसंदर्भात सविस्तर माहिती द्यावी; तज्ज्ञ समितीची मागणी

(Many IMA Doctors at Nagpur not ready to take Corona vaccine)

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.