मुंबई | 27 जानेवारी 2024 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार-साडेचार महिन्यांपासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या अविरत प्रयत्नांना अखेर यश मिळाले. मराठा बांधव मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपले होते. अखेर हे वादळ मुंबईतील आझाद मैदानावर येण्यापूर्वी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मनोज जरांगेच्या मागण्या मान्य शनिवारीच मान्य केल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले होते.
पण मनोज जरांगे पाटील हे अध्यादेशावर अडून राहिल्याने अखेरपर्यंत खलबतं सुरू होती. अखेर अविरत काम करत शुक्रवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास सरकारने मनोज जरांगे यांची भेट घेत चर्चा केली. या भेटीसाठी मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. आणि सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याचे मनोज जरांगेनी जाहीर केले. तसा अध्यादेशही काढण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनला मोठं यश मिळालं.
मुख्यमंत्र्यांसमोर सोडलं उपोषण
त्यानंतर एकच जल्लोष झाला.मध्यरात्रीच्या या घडामोडींनंतर अवघी दोन-तीन तासांची विश्रांती घेऊन मनोज जरांगे शनिवारी सकाळी वाशीतील सभास्थानी निघाले. ११.४५ च्या सुमारास त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ज्यूस पिऊन उपोषण सोडलं.
ज्या मराठा आरक्षणासाठी त्यांनी इतका काळ अविरत लढा दिला, त्या लढ्यासाठी मनोज जरांगे यांच्या नेमक्या मागण्या काय होत्या ? सरकारने त्यातील कोणत्या मागण्या पूर्ण केल्या, ते जाणून घेऊया.
मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या सरकारने केल्या मान्य ?