AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मी उपोषण करणार नाही, पण आता वेगळ्या मार्गाने…”, मनोज जरांगेंचा थेट इशारा

या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याबद्दल मोठे विधान केले. "उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत उपोषण सोडण्याबद्दल मराठा समाजाशी बोलून निर्णय घेणार आहे", असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मी उपोषण करणार नाही, पण आता वेगळ्या मार्गाने..., मनोज जरांगेंचा थेट इशारा
Follow us
| Updated on: Jan 29, 2025 | 8:21 PM

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत उपोषण सुरु केले होते. मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी २५ जानेवारी २०२५ पासून उपोषणाचे हत्यार उपसलं होतं. मनोज जरांगे हे सातव्यांदा उपोषणासाठी बसले होते. त्यांनी आंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले होतं. गेल्या ५ दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषण करत आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. आम्ही गेले पावणे दोन वर्षे आंदोलन केली. मात्र आता वेगळ्या मार्गाने मी आंदोलन करणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील हे गेल्या ५ दिवसांपासून उपोषणासाठी बसले आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, ‘सगे सोयरे’ अंमलबजावणी तातडीने करा, शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्या, कक्ष सुरू करा, वंशावळ समिती गठीत करा, शिंदे समिती मनुष्यबळ वाढवा, संख्याबळ द्या,नोंदी सापडलेल्या लोकांना प्रमाणपत्र द्या, अशा मागण्या त्यांनी सरकारपुढे ठेवल्या आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याबद्दल मोठे विधान केले. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत उपोषण सोडण्याबद्दल मराठा समाजाशी बोलून निर्णय घेणार आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“मी आता उपोषण करणार नाही. पण आता झक पक आंदोलन करणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता उपोषण सोडण्याबाबत मराठा समाजाशी बोलून निर्णय घेणार आहे. आज रात्री किंवा सकाळी मराठा समाजाशी बोलून उपोषण सोडणार” अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.

मी संतोष देशमुखांचे प्रकरण मागे पडू देणार नाही

“आमचे डोळे उघडले आणि मराठा समाजाचे डोळे उघडले आहेत. खऱ्या आरक्षणाचा मारेकरी कोण हे सर्वांना माहित झालं आहे. देवेंद्र फडणवीस जाणून बुजून काम करत नाही, हे मराठा समाजाला कळलं आहे. संतोष देशमुखांचा प्रकरण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. धनंजय देशमुख यांना सकाळी मी बोललो आहे की मी संतोष देशमुखांचे प्रकरण मागे पडू देणार नाही”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“फडणवीस साहेब आता लय दिवस आनंद राहणार नाही”

मी समाजाशी बोलून थोड्या वेळात उपोषणाची भूमिका कळवतो. आज रात्री किंवा सकाळी बोलतो. त्यानंतर माझी भूमिका कळवतो. एवढे दिवस आम्हाला उपोषण करायची वेळ येईल हे अपेक्षितच नव्हतं. फडणवीस गद्दारी मराठ्यांशी करणार असं आम्हाला वाटत नव्हतं. मी उपोषणाला बसलो आणि सिद्ध झालं की देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या मागण्याकडे लक्ष देत नाही. मराठा समाजाच्या मागणीची अंमलबजावणी होईल असा आम्हाला वाटत होतं. परंतु लक्षात आलं की मराठ्यांना काही द्यायचं नाही. आम्ही सकाळी सांगितलं होतं फडणवीसांना आमच्या मागण्या मान्य करायचे का नाही, हे बोललं पाहिजे होतं. परंतु ते काही बोलले नाही. त्यामुळे सिद्ध झालं आहे की मराठा समाजाचा आरक्षणाचा मारेकरी कोण आहे, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

फडणवीस साहेब, आता आनंद लय दिवस राहणार नाही, आनंदावर विरजन पडेल. ज्या दिवशी बोलायचं त्या दिवशी तुम्हाला सांगे. खरी चूक कोणाची आहे हे मराठा समाजाला कळालं आहे. आता आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू आणि आम्ही काय आता वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू. बेईमानी आणि गद्दारी फडणवीस यांच्याकडून होईल असे वाटले नव्हते. जे हक्काचे आहे ते आरक्षण देत नाहीत. आम्हाला उपोषण करायचे नव्हते. आम्हाला वाटले, दोन दिवसात मागण्या पूर्ण होतील. फडणवीस यांनी मात्र चुप्पी मारली. मराठाविषयी किती द्वेष आणि आकस आहे दिसून आले. फडणवीस किती मराठा द्वेषी आहेत, ते उघडे पडले. आंदोलन सोडल्यानंतर सोडणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आता झक पक आंदोलन करणार

“देवेंद्र फडणवीस गद्दारी करतील, असे स्वप्नात वाटले नव्हते. आज रात्री किंवा सकाळी मराठा समाजाशी बोलून उपोषण सोडणार आहे. देवेंद्र फडवणीस यांनी मराठ्यांचे मने जिंकायला पाहिजे होते. मी बोलायला सुरू करेल, तेव्हा तुम्हाला तिन्ही ताळात जागा राहणार नाही. मराठ्यांनी सावध व्हावे, मुला-बाळांचे वाटोळे होऊ देऊ नका. पावणे दोन वर्षे आंदोलन केली. आता वेगळ्या मार्गाने आंदोलन करणार आहे. मराठा समाज उपोषण करणार नाही, पण आता झक पक आंदोलन करणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता उपोषण सोडण्याबाबत समाजाशी बोलून निर्णय घेणार आहेत”, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.