Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“फडणवीस साहेबांनी ॲक्टिव्ह होण गरजेचं, नाहीतर धनंजय मुंडे…” मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?

मी गुंडगिरी करणार, खून करणार, लोकांचे मुडदे पाडणार, जमिनी बळकवणार, प्लॉट बळकवणार असं काहीतरी धनंजय मुंडे वाटत आहे. धनंजय मुंडेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसंना वेगळं चॅलेंज द्यायचं वाटतंय, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

फडणवीस साहेबांनी ॲक्टिव्ह होण गरजेचं, नाहीतर धनंजय मुंडे... मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस, मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Jan 16, 2025 | 8:35 AM

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. या हत्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सध्या या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडून सुरु आहे. तर दुसरीकडे या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यासोबतच राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी मोठे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने माजी न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. याबद्दलचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. आता यावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले आहे.

सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर आरोपही केले. धनंजय मुंडे स्वतःला सिद्ध करू पाहत आहेत. मी सरकारपेक्षा भारी आहे. मी गुंडगिरी करणार, खून करणार, लोकांचे मुडदे पाडणार, जमिनी बळकवणार, प्लॉट बळकवणार असं काहीतरी धनंजय मुंडे वाटत आहे. धनंजय मुंडेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसंना वेगळं चॅलेंज द्यायचं वाटतंय, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

शेवटी समाजाचा संयम सुटला तर धनंजय मुंडेंच्या टोळीला जड जाईल

“धनंजय देशमुख हे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. माझी तब्येत खराब होती. त्या अनुषंगाने ते भेटायला आले होते. न्याय घेण्यासाठी त्यांची तळमळ आहे. धनंजय मुंडेंच्या टोळीने त्यांचे पोट भरलं नाही. अजूनही आरोपीला सोडा म्हणून आंदोलन करत आहेत. राज्यात नवीन पायंडा धनंजय मुंडेंच्या टोळीने सुरू केला आहे. आंदोलन करणं, गुंडगिरी करणं या राज्यात नवीन योजना राबवण्यासारखा आहे. दहशतवादी लोकांना प्रशिक्षण दिल्यासारखं हे असं उगरटपणाने वागायला लागलेत. शेवटी कुटुंब गाव भयभीत होतं. जिल्हा भयभीत करायला लागले. दहशत माजवायला लागले. धनंजय मुंडेंनी या डोळ्यांना आसरा दिला असं वाटतं. खून करून दहशत माजवा, गुंडगिरी करा, तोडफोड करा, दंगली करा हे उन्माद दाखवायला लागले. कुटुंब भयभीत आहे. त्यामुळे त्यांना धीर दिला. आम्ही सोबत आहोत, समाजसोबत आहे. शेवटी समाजाचा संयम सुटला तर धनंजय मुंडेंच्या टोळीला जड जाईल”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सरकार म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून ही लाजिरवाणी गोष्ट

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनावर घेणे गरजेचे आहे. त्यांच्या डोळ्यादेखत सरकारमधल्या मंत्र्यांकडून अशा घटना होणार असल्या तर सरकार म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून ही लाजिरवाणी गोष्ट आहे हे साधं-सुधं नाही, एक प्रकारे फडणवीस साहेबांना आव्हान आहे. त्यांच्या विरोधात जाऊन त्यांनाही चॅलेंज दिले जातं. धनंजय मुंडे स्वतःला सिद्ध करू पाहतं आहेत की मी सरकारपेक्षा भारी आहे. मी गुंडगिरी करणार, खून करणार, लोकांचे मुडदे पाडणार, जमिनी बळकवणार, प्लॉट बळकवणार असं काहीतरी धनंजय मुंडेंना करायचे आहे. त्यांना देवेंद्र फडणीसांना वेगळे चॅलेंज द्यायचं वाटतंय”, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

धनंजय मुंडे सरकारपेक्षा कायद्यापेक्षा मोठे झाले का ?

“देवेंद्र फडणवीस साहेबांनी अॅक्टिव्ह होणं गरजेचे आहे. या गुंडगिरीच्या टोळीचा समूळ नायनाट करणं आवश्यक आहे. याबद्दलच्या चौकशीसाठी समिती नेमली चांगली गोष्ट आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. SIT CID या सगळ्यांनी मिळून ही टोळी मुळासकट उपटून काढली पाहिजे. हे जर सरकार पक्षात राहून सरकारला चॅलेंज करत असेल तर अवघड आहे. तुम्ही खून करता आणि सरकारमध्ये राहून सरकारला चॅलेंज करता. मुख्यमंत्र्यांना चॅलेंज करता म्हणजे धनंजय मुंडे सरकारपेक्षा कायद्यापेक्षा मोठे झाले का?” असा सवाल मनोज जरांगेंनी केला.

“…तर फडणवीस साहेब तुम्हाला पण गिळेल”

“एकदा धनंजय मुंडे म्हटला होता, त्याची क्लिप आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपलं वाकड करू शकत नाही. कोणाच्या जीवावर हा माज आणि मस्ती आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणखी एक काम केलं पाहिजे, इन्कम टॅक्सच्या सगळ्या रेड मारला पाहिजे. सीबीआयच्या चौकशी केल्या पाहिजे. मी फडणवीस साहेबांना सर्व सांगतो हे विषारी आहे, त्याचं विष काढून घ्या. हे राज्यावर विषारी प्रयोग करून पाहत आहे. जर याच्यात हा यशस्वी झाला तर फडणवीस साहेब तुम्हाला पण गिळेल. राज्याला कलंक लावून जाईल”, असेही मनोज जरांगे म्हणाले.

'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर
'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर.
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल.
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?.
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर...
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर....
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?.
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट.
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण...
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण....
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्.
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल.
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी.