राज्य सरकारला मराठा आंदोलनाची धास्ती; शिवजयंतीचा कार्यक्रम कुठे होणार ?

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेचा लढा सुरूच आहे. गेल्या आठवड्यापासून ते पुन्हा उपोषणाला बसले आहेत. चे पडसाद शिवनेरीवर होणाऱ्या शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमात होऊ शकतात, ही शक्यता गृहीत धरून प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुख्य सभेच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे.

राज्य सरकारला मराठा आंदोलनाची धास्ती;  शिवजयंतीचा कार्यक्रम कुठे होणार ?
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 9:05 AM

पुणे | 17 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेचा लढा सुरूच आहे. गेल्या आठवड्यापासून ते पुन्हा उपोषणाला बसले आहेत. सगेसोयरेच्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर व्हावं या मागणीवर ते ठाम असून त्यासाठी आंदोलन सुरू आहे. दरम्यान मराठा आंदोलनाची सरकारला धास्ती आहे. सोमवारी (१९ फेब्रुवारी) शिवजयंती असून त्याच पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जालना येथे झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर मराठा समाजात राज्य सरकारबद्दल प्रचंड रोष निर्माण झाला होता. मराठा आरक्षणाबद्दल खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करून काढलेल्या मसुद्यावर मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांचे समाधान झाले नसून विविध मागण्यांसाठी ते पुन्हा उपोषणाला बसले आहेत. याचे पडसाद शिवनेरीवर होणाऱ्या शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमात होऊ शकतात, ही शक्यता गृहीत धरून प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शिनवेरीवरील मुख्य सभेच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे.

कुठे होणार शिवजयंतीचा कार्यक्रम ?

दरवर्षी शासनाकडून १९ फेब्रुवारी रोजी श्री शिवजयंतीचा शासकीय कार्यक्रम शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहात पार पडतो. राज्यातील वातावरण सध्या मराठा आरक्षणामुळे ढवळून निघालं आहे. जालन्यात झालेल्या लाठीमारामुळे मराठ्यांमध्ये नाराजाीचं वातावरण होतं. याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून शिवनेरीवरील मुख्य सभेच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याकरिता भारतीय पुरातत्त्व विभागानेही तातडीने परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे हे दोन दिवस जुन्नर येथे स्वत: सर्व व्यवस्था पाहण्यासाठी हजर आहेत. तसेच कोणतीही अनूचित घटना घडू नये, म्हणून ग्रामीण पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.