मराठा आरक्षणासाठी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, औरंगाबादेतील धक्कादायक घटना

मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Maratha Reservation Youth Try To Commit Suicide) 

मराठा आरक्षणासाठी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, औरंगाबादेतील धक्कादायक घटना
dhule suicide
Follow us
| Updated on: Jan 20, 2021 | 11:20 PM

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबादमधील क्रांती चौकात ही घटना घडली आहे. या तरुणाने विष प्राशन करत आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. सध्या त्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.(Maratha Reservation Youth Try To Commit Suicide)

मराठा आरक्षणासाठी अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यातच औरंगाबादच्या क्रांती चौकात एक धक्कादायक घटना घडली आहे. औरंगाबादेतील क्रांती चौकात फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दत्ता भोकरे असं विष प्राशन केलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.

मात्र औरंगाबाद पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धावा घेतली. दरम्यान त्याने किती प्रमाणात विष प्राशन केलं आहे, किंवा त्याची प्रकृती कशी आहे, याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण त्याच्या प्रकृतीविषयी अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही.

त्याने उचललेलं पाऊल अतिशय दुर्दैवी – विनोद पाटील

“औरंगाबाद(संभाजीनगर) येथील माझा तरुण सहकारी दत्ता भोकरे यांनी आरक्षणाच्या नैराश्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने उचललेलं पाऊल अतिशय दुर्दैवी आहे, सुदैवाने त्याला वाचवण्यात यश मिळाले. दत्ताची सद्य परिस्थिती प्रकृती चांगली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत,” अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली.

“माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे, कोणत्याही युवकांनी असे पाऊल उचलू नये. आरक्षण आपल्या हक्काचं आहे, न्यायालयात आपल्याला आरक्षण मिळेलच ही खात्री आहे. आपला एक एक जीव हा महत्त्वाचा आहे. हात जोडून विनंती करतो, संयम ठेवा आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आपण जिंकूच!,” असेही विनोद पाटील म्हणाले

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलली

राज्य सरकारनं मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून 12 टक्के आरक्षण दिलं होते. सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली होती. न्या. अशोक भूषण, न्या. नागेश्वर राव, न्या. अब्दुल नजीर, न्या. हेमंत गुप्ता, न्या. रवींद्र भट यांच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाची याचिका आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणप्रकरणी सुनावणीची तारीख 25 जानेवारी देण्यात आली होती. मात्र, आता 5 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

प्रत्यक्ष सुनावणीची मराठा आरक्षण समर्थकांची मागणी

राज्य सरकारने न्यायालयाला प्रत्यक्ष सुनावणीची मागणी केली. येत्या 5 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होईल. पण, ही प्रत्यक्ष सुनावणी होईल की नाही ते निश्चित होईल. या सुनावणीत मराठा आरक्षणाला न्याय मिळेल. व्हिडीओवर सुनावणी घेणं अवघड आहे, हे मराठा आरक्षण समर्थकांचं म्हणणं होतं. आज न्यायालयात विशेष काहीच घडलेलं नाही, पुढील सुनावणी 5फेब्रुवारीला होईल, मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले. मराठा विद्यार्थ्यांचा आज भ्रमनिरास झाला, असं विनोद पाटील म्हणाले. (Maratha Reservation Youth Try To Commit Suicide)

संबंधित बातम्या : 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रत्यक्ष उपस्थिती, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.