Maratha Reservations : मराठा आरक्षणासाठी आणखी एक समिती मैदानात! कोण आहेत समितीत

Maratha Reservations : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. आता कुणबी प्रमाणपत्राच्या पडताळ्यासाठी आणखी 20 तज्ज्ञांची समिती मैदानात उतरली आहे.

Maratha Reservations : मराठा आरक्षणासाठी आणखी एक समिती मैदानात! कोण आहेत समितीत
Follow us
| Updated on: Sep 20, 2023 | 9:30 AM

मुंबई | 20 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली आहे. ही समिती मराठा कुणबी आहेत की नाही , त्यांना ओबीसी प्रमाणपत्रा देण्याविषयीचा पडताळा करत अहवाल सादर करेल. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी हे गाव राज्याच्याच नाही तर देशाच्या नकाशावर आले. काही दिवस राज्यातील घडामोडींचा केंद्रबिंदू या गावातच स्थिरावला होता. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सुरु केले होते. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यात आरक्षण देण्यासाठी ही जागरहाट करण्यात आला. 17 दिवसांच्या उपोषणावर राज्य सरकारने अखेर समितीचा तोडगा काढला. आता निवृत्त न्यायाधीशांची समिती त्यासाठी कामाला लागली आहे. समितीला एक महिन्यात याविषयीचा अहवाल द्यायचा आहे. या समितीला मदतीसाठी राज्य सरकारने 20 तज्ज्ञांची आणखी एक समितीला दिमतीला दिली आहे. कोण आहेत या समितीमध्ये?

20 तज्ज्ञांची समिती मदतीला

निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या मदतीला 20 तज्ज्ञांची समिती गठित करण्यात आली आहे. यामध्ये गृह खात्याचे उपसचिव विजय पोवार, वित्त खात्यातील अवर सचिव रसिक खडसे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव पुजा मानकर यांचा समावेश आहे. या समितीला आरक्षणाविषयी अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. हे काम प्राथमिकतेने पूर्ण करण्याच्या त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या समितीला स्वतंत्रपणे काम करता यावे यासाठी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर कार्यालय देण्यात आले आहे. याठिकाणाहून मराठा आरक्षणाविषयीची सूत्र हालतील.

हे सुद्धा वाचा

जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा परिणाम

अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केल्याने हे गाव राज्य सरकारच्या अजेंड्यावर आले. राज्य सरकारशी जरांगे पाटील यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. राज्य सरकारच्या शिष्टमंडळ सराटीत तळ ठोकून होते. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिष्टमंडळातील सरकारच्या मंत्र्यांना त्यांचे मन वळविण्यात यश आले. 14 सप्टेंबर रोजी जरांगे पाटील यांनी 17 दिवसांचे उपोषण सोडले. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणासाठी त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते.

समिती काय करणार

  • निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांना समितीची मदत
  • मराठा आरक्षणाविषयीचा अहवाल तयार करण्यात मदत
  • ओबीसी पडताळा आणि ओबीसी प्रमाणपत्राविषयीचा निर्णय
  • एका महिन्यात अहवाल सादर करणार
  • मंत्रालयात समितीसाठी स्वतंत्र कक्षाची सोय
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.