महाविकास आघाडीची मॅरेथॉन बैठक, संजय राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांना हवं ते पाठवलं… प्रत्येक जागा…

| Updated on: Jan 25, 2024 | 7:20 PM

मुंबई | 25 जानेवारी 2024 : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीच्या मुंबईत झालेल्या मॅरेथोन बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा निर्णय झाला. तसेच, त्यांना जे पत्र अपेक्षित होते ते पाठविण्यात आले आहे. त्यामुळे येत 30 जानेवारीला होणाऱ्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित असतील. तसेच, राजू […]

महाविकास आघाडीची मॅरेथॉन बैठक, संजय राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांना हवं ते पाठवलं... प्रत्येक जागा...
SANJAY RAUT AND PRAKASH AMBEDKAR
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई | 25 जानेवारी 2024 : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीच्या मुंबईत झालेल्या मॅरेथोन बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा निर्णय झाला. तसेच, त्यांना जे पत्र अपेक्षित होते ते पाठविण्यात आले आहे. त्यामुळे येत 30 जानेवारीला होणाऱ्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित असतील. तसेच, राजू शेट्टी यांच्यासोबतही आमची बोलणी सुरु आहेत अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

महाविकास आघाडीची जागावाटपाची बैठक आज पार पडली. सकाळी 11 वाजता सुरु झालेली ही बैठक सायंकाळी साडेसहा वाजत संपली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेकडून मी स्वत:, विनायक राऊत तसेच सीपीआय, सीपीएमचे प्रतिनिधी उपस्थित होते, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांची सविस्तर चर्चा झाली आहे. महाविकास आघाडी एकसंघ आहे. आम्ही प्रसन्न मुद्रेने बाहेर आलो आहोत. महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांवर चर्चा झाली. आम्ही सगळे सुरक्षित अशा पद्धतीने काम करत आहोत असे राऊत म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आम्ही सर्व नेत्यांनी चर्चा केली आहे. त्यांना एक पत्र पाठविले आहे. त्यांना महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या नेत्यांचे मिळून एक पत्र हवे होते. तसे पत्र आम्ही त्यांना पाठविले आहे. त्याच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा झाली. तसेच, दिल्लीतील नेत्यांनीही चर्चा केली आहे. त्यामुळे भविष्य काळात आम्ही एकत्र काम करु असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

देश वाचायला हवा. संविधान वाचायला हवे, देशातली हुकुमशाही नष्ट केली पाहिजे अशी प्रकाश आंबेडकर यांची भूमिअक आहे. तीच भूमिका प्रकाश अबेद्क्र यांचीही आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. राजू शेट्टी यांच्याशीही चर्चा सुरु आहे. 30 तारखेला सगळी चर्चा होईल असे राऊत यांनी सांगितले.

महाविकास आघाडीतील प्रत्येक जागा ही महाविकास आघाडीची आहे. त्यामुळे कुणीही फोर्मुल्यावर जाऊ नका. राष्ट्रवादीची जागा शिवसेनेची आहे. वान्चीटची जागा राष्ट्रवादीची आहे, राष्ट्रवादीची जागा कॉंग्रेसची आहे. म्हणजेच सर्व घटक पक्ष म्हणून आम्ही काम करणार आहोत. आम्ही सर्व एकत्र आहोत. 30 जानेवारीला होणाऱ्या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रित करण्यात येईल. नितीशकुमार हे इंडिया आघाडीला सोडून जात नाहीत. ते आमच्यासोबत राहतील हा विश्वास आहे. घटक पक्षाच्या प्रत्येक मागणीवर चर्चा होईल. आमच्या एकदम ठीक ठाक सुरु आहे. कोणतेही मतभेद नाहीत असेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.