अखेर बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला, मतदार यादीची तारीख जाहीर होताच…
तब्बल तीन वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. 20 मार्चला मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे लागलीच निवडणुका जाहीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून नाशिक जिल्ह्यासह राज्यातील निवडणुका ( Election ) या लांबणीवर पडल्या आहेत. सुरुवातीला कोरोना त्यानंतर न्यायालयात सुरू असलेल्या प्रलंबित सुनावणीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. मात्र, यामधील बाजार समितील ( Market Committee ) निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकीच्या मतदार यादीचा ( Voter list) कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रमही लवकरच जाहीर होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे शहरासह गावपातळीवर निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.
राज्यातील बाजार समित्यांच्या मतदार यांचा कार्यक्रम आजपासून (10 फेब्रुवारी) सुरू करण्यात आला आहे. याची घोषणा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने 8 फेब्रुवारीला केली आहे.
तब्बल तीन वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. 20 मार्चला मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे लागलीच निवडणुका जाहीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
त्यामुळे गावपातळीवर निवडनिकीचे वेध सुरू झाले असून राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. मतदार याद्या प्रसिद्ध होणार असल्याने राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे.
गावपातळीवरील असलेल्या ग्रामपंचायती, सोसायटी आणि सर्व साधारण संस्थेच्या मतदारांची चाचपणी करू उमेदवार निश्चित करणे, पॅनल तयार करणे अशा प्रकारची लगबग बघायला मिळणार आहे.
तर दुसरीकडे राजकीय पक्ष देखील यामध्ये सहभागी होत असतात. बाजार समितीवर आपलं वर्चस्व असावं यासाठी राजकीय पक्ष मोठी ताकद लावत असतात. त्यामध्ये राज्यातील सत्तांतर झाल्याने राजकीय कलह आणखीच वाढणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, नाशिक, पिंपळगाव, मनमाड, मालेगाव, चांदवड, येवला, देवळा, घोटी, सिन्नर, दिंडोरी, कळवण, सुरगाणा, नांदगाव या बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदारयादी कार्यक्रम होणार आहे.
नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुकीत नवीन सदस्यांची नियुक्ती झाली आहे. त्यामध्ये आता मतदार याद्या बदलणार आहे. मतदार यादीत सुधारणा करावी यासाठी राज्यातील काही जिल्ह्याच्या नागरिकांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली होती.
त्यानुसार 30 एप्रिलच्या आत निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यामुळे 30 एप्रिलच्या आत निवडणुका होणार हे निश्चित झाले असून त्याचीच लगबग आता बघायला मिळणार आहे. 27 फेब्रुवारी ते 8 मार्च प्रारूप यादीवर हरकती घेतल्या जाईल. त्यानंतर 8 ते 17 मार्च हरकतीवर निर्णय होईल आणि अंतिम यादी 20 मार्चला प्रसिद्ध होईल.
एकूणच आता बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून कोणता राजकीय पक्ष बाजारसमितीत बाजीगर ठरतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.