बुलढाण्यातील लोक अचानक टकले का झाले? अखेर झाला उलगडा; तुम्हीही ही चूक करत नाही ना?

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक केसगळतीचे प्रमाण वाढले आहे. ग्रामस्थांच्या केस आणि दाढीचे केस वेगाने गळत आहेत, त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. प्राथमिक तपासणीत दूषित पाण्यात नायट्रेटचा उच्च प्रमाण आढळला आहे, जो केसगळतीचे एक कारण असू शकतो.

बुलढाण्यातील लोक अचानक टकले का झाले? अखेर झाला उलगडा; तुम्हीही ही चूक करत नाही ना?
बुलढाण्यातील लोक अचानक टकले का झाले?
Follow us
| Updated on: Jan 09, 2025 | 11:47 AM

देशात एचएमपीव्ही या व्हायरसने दस्तक देऊन नागरिकांमध्ये दहशत माजवलेली असतानाच बुलढाण्यात वेगळ्याच आजाराने डोकं वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बुलढाण्यातील शेगावमधील ग्रामस्थ अचानक टकले होत आहेत. त्यांचे डोक्याचे आणि दाढीचे केस अचानक गळू लागले आहेत. त्यामुळे गावात जो तो टकला दिसत आहे. पुरुषच नाही तर महिलांमध्येही ही समस्या दिसत आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. हा काय प्रकार आहे? ही भानामती आहे की वेगळाच काही व्हायरस आहे, अशी चर्चा गावात सुरू आहे. या प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेतली असून या सर्व प्रकारामागचं कारणही समोर आलं आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकरणात आता मोठी अपडेट हाती आली आहे. शेगाव तालुक्यातील बोंडगावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. तर पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली असल्याचं या पाण्याच्या तपासणीत उघड झालं आहे. त्यामुळेच गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरत आहे. परिणामी गावातील लोकांच्या केस गळतीचं प्रमाण वाढलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. खारपाणपट्ट्यातील या गावात पिण्याची पाण्याची वेगळी सोय करण्यात आली आहे. मात्र वापरण्याच्या पाण्यात नाइट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने हे पाणी वापरण्यायोग्य देखील नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

दरम्यान, शेगांव तालुक्यातील टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता 51 वर पोहोचली आहे. तीनच दिवसात टक्कल पडत असल्याच्या प्रचंड तक्रारी आल्याने आरोग्य विभागाकडून शेगाव तालुक्यातील घरोघरी सर्वेक्षण सुरू केलं आहे. चर्मरोग तज्ज्ञांचे पथकही गावात दाखल झाले असून प्रथम कठोरा, बोंडगाव, हिंगणा या गावांत तपासणी सुरू केली आहे. फंगल इन्फेक्शनचा हा प्रकार असल्याचे मत तज्ज्ञांनी प्रथमदर्शनी व्यक्त केलं असून हा आजार पाण्यामुळे होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. गावातील पाणी, स्कीनचे नमुने घेण्यात आले असून ते नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभगाना दिलीय. अहवाल आल्यावर केस गळण्याचे नेमके कारण समोर येणार आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहेत लक्षणं ?

या गावातील लोकांना डोक्याला आधी खाज येते. त्यानंतर हळूहळू केस गळू लागतात आणि तीन दिवसातच संपूर्ण टक्कल पडत आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दाढीचेही केस गळत असल्याने गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. एकट्या बोंडगावात 16 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. बालाजी आद्रट यांनी दिली आहे.

कोणत्या गावात किती लोक झाले टकले ?

बोंडगाव – 16 रुग्ण

कालवड – 13 रुग्ण

कठोरा – 7 रुग्ण

भोनगाव – 3 रुग्ण

हिंगणा वैजनाथ – 6 रुग्ण

घुई – 7 रुग्ण

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.