मुंबईच्या शाहूनगर झोपडपट्टीमध्ये भीषण आग, 25 हून अधिक घरं आगीच्या भक्ष्यस्थानी

आगीची भीषणता पाहता अद्यापही आग आटोक्यात आलेली नाही. अजूनही आग धुमसतेच आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करीत आहे.

मुंबईच्या शाहूनगर झोपडपट्टीमध्ये भीषण आग, 25 हून अधिक घरं आगीच्या भक्ष्यस्थानी
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 7:35 AM

मुंबई : पहाटे चार वाजेच्या दरम्यान धारवी झोपडपट्टीजवळील शाहूनगरच्या कमलानगर ( Kamla Nagar Fire ) येथे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. तब्बल 25 हून अधिक घरांना ही लागल्याची माहिती समोर आली आहे. पहाटेच्या वेळेला आग लागताच नागरिकांनी मुंबई महानगर पालिकेच्या ( BMC ) अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, अरुंद जागा असल्याने अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचण्यास अडथळा निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. आगीची भीषणता मोठ्या प्रमाणात असल्याने अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. अद्यापही आग धुमसतेच आहे.

धारावी जवळील शाहूनगर मधील कमला नगर मधील आगीच्या घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाही अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीची घटना घडतात परिसरातील नागरिक सतर्क झाले होते.

कमलानगरच्या झोपडपट्टीत आग लागल्याची माहिती समजताच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. याशिवाय अग्निशमन दलाचे 10 बंब घटनास्थळी दाखल झाले होते.

हे सुद्धा वाचा

आगीची भीषणता पाहता अद्यापही आग आटोक्यात आलेली नाही. अजूनही आग धुमसतेच आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करीत आहे.

अग्निशमन दलाकडून आणखी काही वाहनांना पाचारण करण्यात आले आहे. पहाटेच्या वेळी आग लागल्याने परिसरातील नागरिकांनी सुरुवातीला आग विझवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, आगीने रौद्र रूप धारण केले होते.

अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतोय. त्यामध्ये सुरुवातीलाच अनेक ठिकाणी रस्त्यात वाहने असल्याने बंब घटनास्थळी पोहचण्यास विलंब झाला होता.

मुंबईतील धारवी परिसरातील ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. आग पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणातील गर्दी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना अडचणीची ठरत होती.

खरंतर आगीची घटना कशी घडली याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, शॉर्टसर्किटमुळेच ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

सुदैवाने आगीच्या घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाही. मात्र घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये 25 हून अधिक घरे जळून खाक झाली आहे.

पहाटेच्या वेळेस घडलेली ही आगीची घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असून अनेक नागरिक शाहू नगर परिसरात आगीची स्थिती जाणून घेण्यासाठी गर्दी करत असून पोलीस त्यावर नियंत्रण मिळवत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.