वैद्यकीय परीक्षा रद्द किंवा ऑनलाईन घेणं संयुक्तिक नाही, विद्यार्थ्यांनो तयारीला लागा – अमित देशमुख

विद्यार्थी आणि पालकांनी ही बाब समजून घेऊन परीक्षेला सामोरे जाण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन देशमुख यांनी केलंय.

वैद्यकीय परीक्षा रद्द किंवा ऑनलाईन घेणं संयुक्तिक नाही, विद्यार्थ्यांनो तयारीला लागा - अमित देशमुख
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 3:39 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे. अशावेळी अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय परीक्षांबाबत विद्यार्थी संभ्रमात होते. त्याबाबत बोलताना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय क्षेत्राच्या विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या कारणामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाइन घेणे नियमाला अनुसरून नाही. तसंच न्यायालयानेही त्यास परवानगी दिलेली नाही, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी ही बाब समजून घेऊन परीक्षेला सामोरे जाण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन देशमुख यांनी केलंय. परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. (Amit Deshmukh’s appeal to students to focus on their studies)

राज्यात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 1 जून पर्यंत लॉकडाऊन लागू आहे. त्यामुळे 2 जून पासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या 10 जून पासून घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कोरोना प्रादुर्भावात वाढ न झाल्यास त्या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचे नियोजन आरोग्य विद्यापीठ आणि वैद्यकीय महाविद्यालयानी केलं आहे. असं असताना या परीक्षा रदद कराव्यात, त्या पूढे ढकलाव्यात किंवा त्या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्यात अशी मागणी काही विद्यार्थ्यांची आहे. वास्तविक पाहता वैदयकीय महाविदयालयाकडून शिक्षण घेणारे विदयार्थी भविष्यात डॉक्टर होऊन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत. अशा अत्यंत महत्वाच्या क्षेत्रात भविष्यात काम करण्याची जबाबदारी घेणाऱ्या विदयार्थ्याच्या परीक्षा रदद करणे किंवा ऑनलाईन घेणे संयुक्तीक ठरत नाही, असं अमित देशमुख यांनी म्हटलंय.

‘परीक्षा घेणे अनिवार्य’

त्याच बरोबर केद्रिंय नियामक मंडळालाही ते मान्य नाही. शिवाय उच्चन्यायालयानेही ही बाब नाकारली आहे. त्यामुळे परीक्षा घेणे अनिवार्य ठरत आहे. एकंदरीत या पार्श्वभुमीवर सर्व विदर्यार्थ्यांनी आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करून परीक्षेला सामोरे जाणे हिताचे ठरणार आहे. वैदयकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक यांनीही या संदर्भाने विदयार्थी तसेच त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करावे. परीक्षेसाठी त्यांना प्रेरीत करावं असं आवाहनही देशमुख यांनी केलंय.

विदयार्थ्यांना कोरोना सुरक्षा कवच पुरवले जाणार

मागील वर्षातही कोरोनाचे संकट असतांना महाराष्ट्र आरोग्य विदयापीठाने परीक्षा यशस्वीरीत्या घेतल्या. तसंच त्या सुरक्षीत वातावरणात पार पडल्या आहेत. पुढच्या महिन्यात 10 जूनपासून वेळापत्रकानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी विदयार्थ्यांना संपुर्णत: कोरोना सुरक्षा कवच पुरवले जाणार असून, त्यांच्या आरोग्याची सर्वेातोपरी काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे विदयार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी, असं देशमुख यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

‘विद्यार्थ्यांचं भविष्य आणि करिअर आपण अशाप्रकारे खराब करु शकत नाही’, परीक्षा रद्दच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी

ठाकरे सरकारचा मराठवाड्याला दिलासा देण्याचा प्रयत्न, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला तत्वत: मान्यता

Amit Deshmukh’s appeal to students to focus on their studies

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.