Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंद दिघे यांचं जे झालं, तेच रोशनी शिंदेंचं होण्याची भीती, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली ‘ही’ मागणी

सोमवारी संध्याकाळी ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. दुखापत झाल्याने रोशनी शिंदे यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आनंद दिघे यांचं जे झालं, तेच रोशनी शिंदेंचं होण्याची भीती, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली 'ही' मागणी
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 9:27 AM

ठाणे : शिवसेना नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्याबाबतीत जे घडलं, तेच रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांचंही घडू शकतं, अशी भीती आम्हाला वाटतेय. आनंद दिघे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. उद्धव ठाकरे त्यांना भेटले. निघून गेले आणि अर्ध्या तासातच आनंद दिघे यांचा मृत्यू झाल्याचं घोषित झालं. तेव्हापासून ठाणेकरांच्या मनात जो संशय आहे, तो आजही तसाच आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्याबाबतीत देखील हे घडू शकतं, अशी भीती ठाणेकरांना वाटतेय, ठाकरे गटाकडून त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे रोशनी शिंदे यांना पोलीस संरक्षण द्यावे तसेच त्यांना सिव्हिल सर्जनकडून ट्रिटमेंट द्यावी, अशी मागणी शिंदे समर्थित शिवसेनेच्या नेत्या मिनाक्षी शिंदे यांनी केली आहे.

काय म्हणाल्या मिनाक्षी शिंदे?

रोशनी शिंदे प्रकरणावर आनंद दिघे यांच्या मृत्यूसमयीची आठवण होतेय, ते सांगताना मिनाक्षी शिंदे म्हणाल्या, ‘ त्या वेळीही ठाणेकर संभ्रमात होते. आत काय झालं कुणालाच कळलं नव्हतं. उद्धवसाहेब येऊन गेल्यावर अर्ध्या तासात दिघे साहेबांचा मृत्यू झाला. तेव्हापासून आजही ठाण्याचे लोक संभ्रमात आहेत. त्यामुळे राजकारणाची पातळी वारंवार खाली घसरतेय. दोन डॉक्टरांनी तिला क्लिन चिट दिल्यानंतरही तिला वारंवार प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करतायत. ती प्रेग्नंट नसूनही आहे म्हणून सांगतायत. एवढी अॅक्टिंग करायला लावली की… हे का चाललंय हे कळलं नाही.

एखाद्या डॉक्टरांनी इंजेक्शन…

रोशनी शिंदे प्रकरणात ठाकरे गटाकडून तिच्या जीवाला भीती आहे, अशी शक्यता मिनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, ‘ उद्या कुठल्या डॉक्टरांनी तिला इंजेक्शन देऊन मारलं तर काही कळणार नाही. त्यामुळे आम्ही पोलीस प्रोटेक्शनची मागणी करतोय. तिथे मुख्यमंत्र्यांनी सिव्हिल सर्जन नेमावे, अशीही आमची मागणी आहे.

माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भातील एका पत्राद्वारे केली आहे. या पत्रातून त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राजन विचारेस जितेंद्र आव्हाड यांच्या नावाच्या उल्लेख केलेला आहे.

रोशनी शिंदे सध्या कुठे?

सोमवारी संध्याकाळी ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. दुखापत झाल्याने रोशनी शिंदे यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काल त्यांना लिलावती रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रोशनी शिंदे यांना काहीही झालेलं नाहीये, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतोय. तर रोशनी शिंदे यांच्या पोटात लाथा बुक्क्यांनी मारहाणा केली, आयव्हीएफची ट्रिटमेंट सुरु असताना तिच्या पोटात

धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा टोला.