Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक महापालिकेत कमबॅक करण्यासाठी मनसे सज्ज!, नवीन वर्षात राज ठाकरेंचा नाशिक दौरा

नाशिकमधील मनसेच्या जुन्या आणि कट्टर समर्थक सकाळी कृष्णकुंजवर दाखल झाले. सुमारे सव्वा तास चाललेल्या या बैठकीत राज यांनी जुन्या आणि निष्ठावान मनसैनिकांचं म्हणणं ऐकूण घेतलं. नाशिकमधील पक्षाची सध्यस्थिती पदाधिकाऱ्यांनी राज यांच्यासमोर मांडली.

नाशिक महापालिकेत कमबॅक करण्यासाठी मनसे सज्ज!, नवीन वर्षात राज ठाकरेंचा नाशिक दौरा
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 4:28 PM

नाशिक: आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं मनसेकडून कम बॅक करण्यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. मनसेच्या जुन्या आणि निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी आज ‘कृष्णकुंज’वर जात राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी राज ठाकरे यांनी नाशिक मनसेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी नवीन वर्षात नाशिक दौरा करणार असल्याचे सांगितल्यानं मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह संचारला आहे. (Meeting of MNS workers in Nashik and Raj Thackeray at Krishnakunj)

नाशिकमधील मनसेच्या जुन्या आणि कट्टर समर्थक सकाळी कृष्णकुंजवर दाखल झाले. सुमारे सव्वा तास चाललेल्या या बैठकीत राज यांनी जुन्या आणि निष्ठावान मनसैनिकांचं म्हणणं ऐकूण घेतलं. नाशिकमधील पक्षाची सध्यस्थिती पदाधिकाऱ्यांनी राज यांच्यासमोर मांडली. यावेळी नाशिक महापालिकेवर मनसेचा झेंडा पुन्हा फडकवायचा असेल तर काय करावं लागेल, याबाबतही राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं, तशी माहिती नाशिक मनसेचे पदाधिकारी पगार शिंत्रे यांनी दिली आहे.

नाशिक पुन्हा मनसेचा गड होणार?

नाशिक हा मनसेचा गड मानला जातो. नाशिककरांनी कधीकाळी महापालिकेची एकहाती सत्ता आणि तिनही आमदार देत मनसेला मोठा पाठिंबा दिला होता. मात्र मधल्या काळात पक्षांतर्गत कुरघोडी, गटातटात विखुरलेली संघटना आणि राज यांनी सत्ता गेल्यानंतर नाशिककडे केलेलं दुर्लक्ष यामुळे पक्षाला मरगळ आली होती. मात्र राज यांनी पुन्हा एकदा नाशिकवर लक्ष केंद्रित केल्यास मनसेला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज ठाकरे पुढील वर्षाच्या सुरुवातीला नाशिकचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पक्षाची पुनर्बांधणी आणि मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. शिवाय महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय खेळी खेळतात हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

मनसेच्या 50 पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक

मनसेचे 50 पदाधिकारी आणि राज ठाकरे यांची महत्वाची बैठक पार पडल्याची माहिती मिळत आहे.. राज यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी ही तातडीची बैठक पार पडली. यामध्ये तब्बल 50 पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावर अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तरी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचं बोललं जात आहे. मनसे शहर आणि जिल्हा कार्यकारिणीत नव्या वर्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही तातडीने बैठक घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. या बैठकीत महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

राज ठाकरेंसोबत मनसेच्या 50 पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक, पक्षात मोठ्या बदलाचे संकेत

राज ठाकरेंची मराठी माणसाबद्दलची भूमिका मान्य, पण आमचं हिंदुत्व व्यापक : देवेंद्र फडणवीस

Meeting of MNS workers in Nashik and Raj Thackeray at Krishnakunj

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.