रविवारी फिरायला बाहेर पडायचा प्लान ? आधी हे वाचाच… मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक, कसं असेल शेड्युल ?

मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या, रविवार 8 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कामासाठी, एखाद्या समारंभासाठी किंवा बाहेर फिरण्यासाठी रेल्वेने जाण्याचा विचार असेल तर आधी ही बातमी पूर्ण वाचा, शेड्युल जाणून घ्या आणि मग प्रवास प्लान करा..

रविवारी फिरायला बाहेर पडायचा प्लान ? आधी हे वाचाच... मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक, कसं असेल शेड्युल ?
railway localImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Dec 07, 2024 | 9:10 AM

विवारच्या सुट्टीची संधी साधून बरेच मुंबईकर बाहेर फिरायला किंवा समारंभासाठी बाहेर पडत असतात. तुमचाही उद्या हाच प्लान आहे का ? मग आधा हे थांबा, हे वाचा आणि मगच तुमचा प्रवास प्लान करा. अहो का काय विचारताय ? दिवसरात्र वेगाने धावणारी, लाखो मुंबईकरांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणारी, मुंबईकरांची लाईफलाइन अशी ख्याती असलेल्या रेल्वेवर, तेही मध्य रेल्वेवर उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे ना. त्यामुळेच उद्या कुठे, कधी, कोणत्या मार्गावर , किती वेळासाठी ब्लॉक असणार आहे याची सगळी माहिती वाचा आणि मगच… प्रवास करा.

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या, रविवार 8 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 पर्यंत वाजेपर्यंत माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ( सीएटृसएमटी) सुटणाऱ्या आणि त्या दिशेने येणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावरील जलद लोकल या माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच, या लोकल 15 मिनिटे उशिराने धावतील.

तर हार्बर मार्गावरही कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.10 ते 4.40 वाजेपर्यंत सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे या मार्गावर ब्लॉक असेल.

कोकण रेल्वेवर दोन दिवसीय ब्लॉक

कोकण रेल्वे मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी देखील आज आणिउद्या अर्थात 7 व 8 डिसेंबर रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. करमळी-वेर्णा स्थानकांदरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार असून या ब्लॉकमुळे प्रामुख्याने चंदीगड-तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस, नागपूर-मडगाव एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यामुळे इतर रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

कोकण रेल्वेच्या करमळी-वेर्णा विभागात 7 डिसेंबर रोजी दुपारी 4.10 ते संध्याकाळी 5.55 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. एक ते दोन तास रेल्वेगाड्यांना थांबा दिल्याने इतर रेल्वेगाड्या देखील विलंबाने धावणार आहेत अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.