लग्नाच्या बस्त्यासाठी निघताना विचार करा… रविवारी कोणत्या मार्गांवर मेगा ब्लॉक? कसं आहे संडेचं टाइम टेबल? वाचा
लाखो मुंबईकरांची लाईफलाइन असलेली लोकलसेवा ही अविरत धावत असते. पण त्याच लोकलच्या दुरूस्तीसाठी, देखभालीसाठी येत्या रविवारी, म्हणजेच उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे जर रविवारची सुट्टीची संधी साधून फिरायला बाहेर पडायचा, किंवा लग्नाच्या खरेदीसाठी जाण्याचा विचार असेल तर त्यापूर्वी रेल्वेचा मेगाब्लॉक कधी, केव्हा, कोणत्या मार्गावर असेल त्याची पूर्ण माहिती वाचून घ्या.

गेल्या आठवड्यातही मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर, मध्य आणि पश्चिम अशा तिन्हीही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे, तसेच अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला .
मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्ग तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर देखभालीसाठी कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा रविवारी खोळंबा होण्याची शक्यता आहे. या मेगाब्लॉकच्या काळात मध्य रेल्वे, तसेच र्बर रेल्वे, पश्चिम रेल्वेची लोकल सेवा काही काळासाठी उपलब्ध नसेल.
कसं असेल रविवारचं टाइम टेबल?
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर रविवारी सकाळी 11.55 ते दुपारी 4.55 पर्यंत ब्लॉक असेल. सीएसएमटी ते विद्याविहार या दरम्यान धिम्या मार्गावर उद्या हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
तर पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान दुपारी 12.00 ते 4.00 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाईल.
हार्बर मार्गावरील ब्लॉक सकाळी शिळफाट्यावर 10.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत असेल. यामुळे हार्बर मार्गावरील पनवेलकडील सेवा ठप्प राहणार आहे. मात्र ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर विशेष लोकल धावणार आहेत.
सर्व प्रवाशांना पर्यायी मार्गांचा उपयोग करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.