MPSC Result : राज्यसेवा मुख्य परिक्षा 2020 ची गुणवत्ता यादी जाहिर, प्रमोद चौगुले आणि रुपाली माने राज्यात प्रथम

| Updated on: Apr 29, 2022 | 11:39 PM

या परिक्षेत प्रमोद चौगुले यांनी राज्यात प्रथम तर रुपाली माने यांनी महिलांमधून प्रथम क्रमांक पटकावला. ऑप्टिंग आऊटच्या प्रक्रियेनंतर शिफारसपत्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल.

MPSC Result : राज्यसेवा मुख्य परिक्षा 2020 ची गुणवत्ता यादी जाहिर, प्रमोद चौगुले आणि रुपाली माने राज्यात प्रथम
राज्यसेवा मुख्य परिक्षा 2020 ची गुणवत्ता यादी जाहिर
Image Credit source: Facebook
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC)तर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परिक्षा 2020 ची अंतिम निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (Merit List) शुक्रवारी जाहीर करण्यात आली. या परिक्षेत प्रमोद चौगुले यांनी राज्यात प्रथम तर रुपाली माने यांनी महिलांमधून प्रथम क्रमांक पटकावला. ऑप्टिंग आऊटच्या प्रक्रियेनंतर शिफारसपत्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. मुलाखती झाल्यानंतर अवघ्या काही तासांत आयोगाने अंतिम निकाल जाहीर केला. त्यात प्रमोद चौगुले याने प्रथम, नितेश कदम याने द्वितीय, रुपाली माने हिने तृतीय तर  शुभम जाधव आणि अजिंक्य जाधव यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक पटकवला आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यानी जोरदार जल्लोष केला. (Merit list of State Service Main Examination 2020 announced)

मुलाखती संपल्यानंतर दोन तासात गुणवत्ता यादी जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मार्च 2021 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. पूर्व परिक्षेसाठी 2 लाख 62 हजार 891 उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी 1 लाख 71 हजार 116 उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यापैकी 3 हजार 214 उमेदवारांची मुख्य परिक्षेसाठी निवड करण्यात आली. त्यानंतर डिसेंबरमध्ये 2 हजार 863 उमेदवारांनी मुख्य परीक्षा दिली. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसिलदार अशा वर्ग 1 च्या पदांसाठी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेत पात्र झालेल्या 597 उमेदवारांची 18 ते 29 एप्रिल दरम्यान मुलाखती घेऊन दोन तासात अंतिम निकालाची सर्वसाधारण यादी जाहीर करण्यात आली.

कोरोनामुळे परिक्षा लांबणीवर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून डिसेंबर 2019 मध्ये 200 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. एप्रिल 2020 मध्ये परिक्षा नियोजित करण्यात आली होती. मात्र तत्पूर्वीच कोरोनाने भारतात शिरकाव केल्याने मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन लागला. यामुळे परिक्षा तब्बल चार वेळा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर अखेर मार्च 2021 मध्ये पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परिक्षेचा सप्टेंबर 2021 मध्ये निकाल लागला. यामध्ये पात्र उमेदवारांची डिसेंबर 2021 मध्ये परीक्षा घेण्यात आली. मुख्य परिक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम संपताच अवघ्या काही तासात गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

(Merit list of State Service Main Examination 2020 announced)