पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाज : 11 दिवस धो- धो पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

Panjabrao Dakh on Maharashtra Rain : हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे. सप्टेंबरच्या शेवटी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. तर काही जिल्ह्यांना अलर्ट राहण्याच्याही सूचना डख यांनी दिल्या आहेत. वाचा सविस्तर...

पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाज : 11 दिवस धो- धो पाऊस कोसळणार; 'या' जिल्ह्यांना अलर्ट
पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाजImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 16, 2024 | 11:15 AM

सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर आपण आहोत. सध्या काही भागात पावसाने विश्रांती घेतलीय. तर कुठे रिमझिम पाऊस पडतोय. अशात आता येत्या काळात पाऊस कसा असेल? याबाबतचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पुढचे पाच ते सहा दिवस हवामान कोरडं राहणार आहे. 20 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रभरात कोरडं हवामान राहील. या काळात पावसाने विश्रांती पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र मुसळधार पाऊस कोसळणार आहे. पंजाबराव डख यांनी तसा अंदाज व्यक्त केला आहे.

कधी होणार मुसळधार पाऊस?

बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर 21 तारखेनंतर पुन्हा एकदा राज्यात पाऊस बरसायला होणार आहे. 21 सप्टेंबरपासून चांगला पाऊस होण्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. 21 सप्टेंबरपासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 2 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस होणार आहे.

21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात धो-धो पाऊस होणार आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर , पुणे, बीड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्ता राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अलर्ट राहावं, असं पंजाबराव डख यांनी सांगितलंय.

शेतकऱ्यांना काय सल्ला?

राज्यात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 11 दिवस धो- धो पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच सतर्क राहावं, असा सल्ला डख यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी या काळात आपल्या पिकांची काळजी घ्यावी. उडीद, सोयाबीन ही पीकं शेतकऱ्यांनी काढून घ्यावीत. 21 तारखेनंतर जोरदार पाऊस होणार आहे. पण त्याआधी कोरडं हवामान असणार आहे. त्यामुळे काळात काढणीला आलेली पिकं काढून घ्या, असं सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे.

ऑक्टोबर महिन्याची सुरुवात पावसाने होणार आहे. सुरुवातीचे दोन दिवस म्हणजेच 1 आणि 2 ऑक्टोबरला चांगला पाऊस होईल. त्यानंतर 7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. तर यंदा नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच गुलाबी थंडी अनुभवता येणार आहे. 5 नोव्हेंबरपासून कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार असल्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केलाय.

Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?.
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी.
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.