Vinayak Mete No More : रस्ते मार्गानेच मेटेंचे पार्थिव बीडकडे होणार रवाना, सोमवारी दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार
विनायक मेटे यांच्या निधनानंतर पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यानंतर अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव हे मुंबईतील निवासस्थानी ठेवले जाणार आहे. येथे कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी दर्शन घेतल्यानंतर रस्ते मार्गानेच पार्थिव हे बीडकडे रवाना होणार आहे. मार्गस्थ होत असताना वाशी नाका, कळंबोली, तळेगाव येथे त्यांच्या पार्थिवावर श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.

मुंबई : (Shivsnagram Leader) शिवसंग्रामचे नेते तथा माजी आमदार (Vinayak Mete) विनायक मेटे यांचा अपघातामध्ये निधन झाले आहे. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झाला होता. त्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. यानंतर आता त्यांच्या पार्थिवावर (Beed) बीड येथे अंत्यसंस्कार होणार असून त्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरवात झाली आहे. सर्वसामान्य जनतेला आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेता यावे म्हणून रस्ते मार्गानेच त्यांचे पार्थिव हे आता बीडकडे रवाना होणार आहे.
असा असणार आहे पार्थिवाचा प्रवास
विनायक मेटे यांच्या निधनानंतर पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यानंतर अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव हे मुंबईतील निवासस्थानी ठेवले जाणार आहे. येथे कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी दर्शन घेतल्यानंतर रस्ते मार्गानेच पार्थिव हे बीडकडे रवाना होणार आहे. मार्गस्थ होत असताना वाशी नाका, कळंबोली, तळेगाव येथे त्यांच्या पार्थिवावर श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. चाकण, शिक्रापूर, नगर, टाकळी मार्गे पार्थिव हे बीड येथील त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास अंत्यसंस्कार
मेटे यांच्या निधनानंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. मुंबई येथील निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर बीड येथील निवसास्थानी पार्थिव हे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार हे होणार आहेत. बीड शहरातील उत्तम नगर येथे त्यांची शेती असून याच शेतामध्ये अंत्यसंस्कार हे केले जाणार आहेत. त्याअनुशंगाने आता तयारीही सुरु झाली असल्याचे भाजपाचे आ. प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे.
कार्यकर्ते बीडकडे मार्गस्थ
शिवसंग्रामच्या माध्यमातून विनायक मेटे यांनी सबंध राज्यात संघटन निर्माण केले होते. एवढेच नाही तर कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी राजकारणात वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. आता त्यांच्या अंतिम दर्शनासाठी राज्यभरातून कार्यकर्ते हे बीडकडे मार्गस्थ होत आहेत. तर उद्या अंत्यसंस्कारासाठी राजकीय नेतेही हजेरी लावतील असे दरेकर यांनी सांगितले आहे.