सोलापूरहून निघालेल्या मजुरांच्या एसटीला यवतमाळमध्ये भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

मजुरांना आपल्या मूळगावी घेऊन जाणाऱ्या एसटी बसने टिप्परला मागून धडक दिली. बसमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 22 जण जखमी आहेत. (Migrant Workers travelling from Solapur to Jharkhand killed in Bus Accident in Yawatmal)

सोलापूरहून निघालेल्या मजुरांच्या एसटीला यवतमाळमध्ये भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
Follow us
| Updated on: May 19, 2020 | 8:55 AM

यवतमाळ : लॉकडाऊनच्या घरची वाट धरणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या अपघाताचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. सोलापूरहून कामगारांना झारखंडला घेऊन जाणाऱ्या एसटी बसची टिप्परला धडक बसून यवतमाळमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये बसमधील चौघा मजुरांचा जागीच मृत्यू झाला. (Migrant Workers travelling from Solapur to Jharkhand killed in Bus Accident in Yawatmal)

मजुरांना आपल्या मूळगावी घेऊन जाणाऱ्या एसटी बसने टिप्परला मागून धडक दिली. यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णीजवळील कोळवन गावानजीक हा अपघात झाला. सोलापूरहून निघालेले मजूर एसटी बसने झारखंड राज्यात जात होते.

ही धडक इतकी भीषण होती, की बसमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 22 जण जखमी आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी आर्णी आणि यवतमाळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

हेही वाचाउत्तर प्रदेशमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, 24 जणांचा मृत्यू

चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यात मजुरांनी भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला होता. एका मालवाहू ट्रकने मजुरांनी भरलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला होता. या दुर्घटनेत 23 मजुरांचा जागेवर मृत्यू झाला तर एका मजुराचा उपचारदरम्यान मृत्यू झाला होता.

गेल्या आठवड्यात बिहारला जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांचा उत्तर प्रदेशमध्ये बसखाली चिरडून मृत्यू झाला होता. मुझफ्फरनगर-सहारनपूर महामार्गावरुन चालणार्‍या सहा मजुरांना भरधाव बसने चिरडले होते. घळौली चेकपोस्टजवळ रात्री उशिरा हा अपघात झाला होता.

मालवाहू ट्रेनखाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली होती. रात्रीच्या वेळेस रेल्वे रुळावरच विश्रांती घेण्यासाठी झोपलेल्या मजुरांचा पहाटेच्या सुमारास करुण अंत झाला. जालन्यातील स्टील कंपनीत काम करणारे मजूर मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी होते. (Migrant Workers travelling from Solapur to Jharkhand killed in Bus Accident in Yawatmal)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.