Solapur Earthquake : सोलापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, उत्तर कर्नाटकमध्ये 4.9 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

सोलापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.

Solapur Earthquake : सोलापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, उत्तर कर्नाटकमध्ये 4.9 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
सोलापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्केImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 8:55 AM

सोलापूर – सोलापूरमध्ये (Solapur) भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. सोलापूर जिल्ह्यानजीक असलेल्या कर्नाटक राज्यातील विजयपूर (Karnataka Vijaypur) जिल्ह्यात भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. उत्तर कर्नाटकमध्ये 4.9 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती समजली आहे. तसेच सोलापूर शहरातील रामवाडी परिसरातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. भूकंपामुळे किती ठिकाणी नुकसान झाले याची अद्याप माहिती मिळालेली नाही.

सोलापूर शहरातील रामवाडी परिसरात सौम्य धक्के जाणवले

आज सकाळच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे. सुरुवातीला नेमकं काय सुरु अशी लोकांना गडबड जाणवली होती. त्यानंतर भूकंप झाल्याची माहिती लोकांना मिळाली आहे. सोलापूरपासून काही अंतरावर असलेल्या कर्नाटक राज्यात विजयपूर येथे भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. त्या ठिकाणी 4.9 रिस्टर स्केल भूकंप झाल्याची नोंद झाली आहे.  अद्याप कोणत्याही प्रकारची जिवितहाणी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.  सोलापूर शहरातील रामवाडी परिसरातील लोकांना सौम्य धक्के लागल्याची त्यांनी माहिती दिली आहे. भूकंप झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून कुठे काय घडलं आहे का ? याची चौकशी केली जात आहे. राज्यात मागच्या काही दिवसात अतिवृष्टी झाली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे

महाराष्ट्रात मागच्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे अद्याप नुकसान झालेलं नाही. परंतु सकाळी भूकंप झाल्यानंतर काही दुर्घटना घडली आहे का ? याची जिल्हा प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे. त्यामुळे अद्याप कोणतीही दुर्घटना घडली नसल्याची माहिती मिळाली आहे.

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.